निरोगी आणि हेल्दी पचनक्रियेसाठी खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणं गरजेचं असतं. बरेचसे लोक पचनासंबधित समस्यांमुळे त्रासलेले असतात. गॅसची समस्या उद्भवल्यास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास होतो. वारंवार पोट साफ होण्याच्या गोळ्या घेतल्यानंतरही शरीरावर चुकीचा परीणाम होतो. (Constipation) दूधात छोटीशी वस्तू घालून याचे सेवन केल्यास गॅसेसचा त्रास कमी होईल. (Home Remedies For Constipation)
दूधात चमचाभर तूप मिसळून प्या
एका अभ्यासानुसार मनुक्यांचे सेवन तुपाबरोबर केल्यानंही कॉन्स्टिपेशनच्या समस्येपासून आराम मिळतो. (Ref) जर तुम्हालाही पचनासंबंधित समस्या उद्भवत असतील तर एक ग्लास दूधात चमचाभर साजूक तूप किंवा घरचं गाईचं दूध मिसळून प्या त्यात चिमुटभर हळद घाला. रात्री झोपण्याआधी या दूधाचे सेवन करा. या उपायाने हाडं मजबूत होतील आणि गॅसची समस्या उद्भवणार नाही. याशिवाय ज्या लोकांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही त्यांनाही या समस्येपासून आराम मिळेल. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि शरीर आतल्या बाजूने क्लिन होत जाईल.
तुपातील पोषक तत्व पोटासाठी फायदेशीर
तुपात लॅक्सेटिव्ह गुण असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि मल त्याग करण्सास मदत होते. रात्री झोपण्याच्या आधी दूधात तूप मिसळून प्यायल्याने गॅसपासून आराम मिळतो. तूपात ब्युटिरिक एसिड असते. ज्यामुळे गॅसपासून आराम मिळतो. इतकंच नाही तर तुपातील पोषक तत्व मेटाबॉलिझ्म सुधारतात. दूधाबरोबर तुम्ही तुपाचेही सेवन करू शकता. लेक्टोज टॉलरेंसची समस्या असेल तर तुम्ही तूप आणि खडीसारखेचे सेवन रात्री झोपण्याआधी करू शकता.
गॅसेस, कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळण्यासाठी आहारात काय बदल करावेत?
१) तुमचंही पोट साफ होत नसेल तर भरपूर पाणी प्या.
२) चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नका.
३) चपाती किंवा तांदळाच्या तुलनेत सॅलेड आणि हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खा.
सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....
४) रात्रीच्या जेवणात गॅस वाढवणारे पदार्थ खाऊ नका. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी छोले, चणे, राजमा, उडीद डाळ, दाल मखनी, चण्याची डाळ, खिचडी या पदार्थांचे सेवन करा.
५) रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याआधी कमीत कमी ३० मिनिटं मंद गतीने वॉक करा.