बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर बऱ्याच प्रमाणात होत आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणवतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे सकाळी व्यवस्थित पोट साफ न होणे. आहारतज्ज्ञांच्या मते भारतात जवळपास २२ टक्के लोकांना कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो (How to reduce constipation trouble). हा त्रास नेमका का होतो, त्यामागची काही कारणं आणि त्यावरचे उपाय आहारतज्ज्ञांनी सांगितलेले आहेत (reasons for constipation and its solution). तुमचा त्रास कमी होण्यासाठी आणि पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. (home remedies for constipation)
पोट साफ न होण्यामागची कारणं
पोट व्यवस्थित साफ न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात आणि त्यावर काय उपाय करता येतील, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dt.shwetashahpanchal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
१. आहारात पुरेशा प्रमाणात धान्य, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स नसतील तर पोट साफ होण्यास त्रास होऊ शकतो.
२. काही जणांचं कामाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे जेवणाचं, झोपेचं कोणतंही ठराविक रुटीन नसतं. अशा लाेकांमध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचं प्रमाण जास्त आहे.
करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते?
३. मिटिंग, प्रवास किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वारंवार नैसर्गिक विधी करणं टाळत असाल तर त्याचा त्रास बद्धकोष्ठतेमध्ये होऊ शकतो.
४. आयर्न सप्लिमेंट्स किंवा अन्य काही औषधी घेत असाल तर त्याच परिणामही पोट साफ होण्यावर होऊ शकतो.
५. सतत कोरडं अन्न खात असाल, जेवणातून पुरेसे द्रव पदार्थ पाेटात जात नसतील तर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.
बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्यासाठी उपाय
१. कोणत्याही प्रकाराचा व्यायाम नियमितपणे करावा.
२. जेवणाच्या, झोपेच्या वेळा ठरलेल्या असू द्या. त्यांच्यामध्ये वारंवार बदल करू नका.
बोअरवेलच्या पाण्यामुळे केस खूप गळतात? केस गळणं कमी करण्यासाठी २ उपाय करून पाहा
३. रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या २ ते ३ भाज्या असू द्या.
४. जवस आणि दही एकत्र करून खाल्ल्यानेही कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो.