Join us   

रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल; वापरा पुदीना अन् आल्याचा खास फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 3:50 PM

Home remedies for constipation : काहीजण पोट साफ होण्याच्या गोळ्या दोन दिवसाआड घेतात ते ही पूर्णपणे चुकीचं आहे.

बाहेरचे पदार्थ खाल्ले, जेवणाच्या वेळा चुकल्या, नाश्ता केला नाही... अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांना सकाळी व्यवस्थित पोट साफ व्हायला त्रास होतो. (Natural Home Remedies For Constipation) कधी दिवसभर गॅस पास होतो तर कधी पोट फुगतं. यामुळे दिवसवर निसुत्साही वाटतं. पोट साफ होण्यासाठी रोज रात्री चुर्ण घेण्याची सवयही योग्य नाही. (Home remedies for constipation)

काहीजण पोट साफ होण्याच्या गोळ्या दोन दिवसाआड घेतात ते ही पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेत असाल तर गोष्टी वेगळी आहे पण जर मेडीकलमधून विदाऊट प्रिस्क्रीप्शन गोळ्या घेणं तब्येतीला चांगलं नाही. डॉक्टर किरण कुकरेजा यांनी पोट साफ न होण्याची समस्या टाळण्यासाठी काही घरगुती उपाय सुचवले आहेत.  (Constipation Remedies)

कॉन्स्टिपेशन ही एक सामान्य स्थिती आहे ज्यामुळे अत्यंत अस्वस्थता येते. जेव्हा तुमची आतडे तुमच्या आतड्यांमधून कचरा बाहेर काढत नाहीत, तेव्हा दबाव तीव्र असू शकतो आणि आराम न मिळाल्यानं तुम्हाला खूप हताश वाटू शकते. दोन कप पाण्यात पुदिन्याची पानं घाला. नंतर १ चमचा जीरं पावडर, किसलेलं आलं घाला. हे पाणी  ८ ते १० मिनिटांसाठी उकळून घ्या. त्यात १ ते २ लिंबाचे थेंब घाला. तयार आहे कॉन्स्टिपेशनवर सुपर ड्रिंक.

टॅग्स : आरोग्य