Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल

डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल

Winter Care Tips For Kids: लहान मुलांना सर्दी- खोकला झाल्यावर दरवेळी औषध- गोळ्या देण्यापेक्षा हा घरगुती उपाय करून पाहायला हरकत नाही...(home remedies for cough and cold to kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2024 09:13 AM2024-12-01T09:13:32+5:302024-12-01T09:15:02+5:30

Winter Care Tips For Kids: लहान मुलांना सर्दी- खोकला झाल्यावर दरवेळी औषध- गोळ्या देण्यापेक्षा हा घरगुती उपाय करून पाहायला हरकत नाही...(home remedies for cough and cold to kids)

home remedies for cough and cold to kids, how to cure cold and cough in kids naturally | डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल

डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल

Highlightsसलग ३ दिवस हा उपाय केल्यास मुलांची सर्दी, खोकला, छातीत जमा झालेला कफ बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 

हिवाळ्याचा कडाका आता चांगलाच जाणवायला लागला आहे. महाराष्ट्रात तर कित्येक ठिकाणी तापमान १० डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी आहे. त्यामुळेच अगदी दिवसाही अंगात स्वेटर घालून बसावं लागत आहे. या थंडगार वातावरणाचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना. उबदार कपडे घालायला, कानाला रुमाल बांधायला किंवा टोपी घालायला मुलं नाही म्हणतात. पायात सॉक्स घालणं त्यांना आवडत नाही. यामुळे मग थंडीचा त्रास होतो आणि चटकन सर्दी- खोकला होतो. सर्दी- खोकल्याचा त्रास वाढू नये म्हणून आई- वडील त्यांना लगेचच औषध- गोळ्या देतात (Winter Care Tips For Kids). पण असं वारंवार औषधं देणं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणूनच अशावेळी औषध- गोळ्या टाळून कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयी डॉक्टरांनी स्वत:च सांगितलेली ही माहिती (how to cure cold and cough in kids naturally?)

 

मुलांना सर्दी- खोकला झाल्यास घरगुती उपाय

मुलांना सर्दी- खोकला झाल्यावर त्यांना घरच्याघरी आयुर्वेदिक पद्धतीने काय औषध देता येऊ शकतं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी mylittlemoppet_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

डॉक्टर सांगतात की हा उपाय करण्यासाठी एक चमचा तूप घ्या. त्या तुपामध्ये दोन लवंगा आणि एक किंवा दोन मिरे टाका. ते तुम्ही अखंड टाकले तरी चालतील किंवा थोडे ठेचून घेतले तरी चालतील.

 

तूप गरम करा. त्याला हलकासा चॉकलेटी रंग आल्यावर गॅस बंद करा. यामुळे लवंग आणि मिऱ्यांचा अर्क तुपामध्ये उतरेल. तूप थोडं कोमट झालं की त्यातले लवंग, मिरे काढून ते मुलांना प्यायला लावा.

१ महिन्यात उतरेल वजन- पाेट होईल सपाट, हिवाळ्यात झटपट वेटलॉससाठी नाश्त्यामध्ये खा ४ पदार्थ

मुलं थोडी मोठी असतील तर ते लवंगाचे तुकडे चावूनही खाऊ शकतात. हा उपाय दिवसातून एकदा करा. सलग ३ दिवस हा उपाय केल्यास मुलांची सर्दी, खोकला, छातीत जमा झालेला कफ बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 


 

Web Title: home remedies for cough and cold to kids, how to cure cold and cough in kids naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.