Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत खोकला आणि घशात खूप खवखवतं? १ सोपा उपाय, उबळ-खवखव होईल कमी

सतत खोकला आणि घशात खूप खवखवतं? १ सोपा उपाय, उबळ-खवखव होईल कमी

Health Tips For Dry Cough: खोकला मागे लागला की लवकर पाठ सोडत नाही. म्हणूनच हा एक उपाय करून बघा. लवकर आराम मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 01:09 PM2022-12-15T13:09:23+5:302022-12-15T13:25:59+5:30

Health Tips For Dry Cough: खोकला मागे लागला की लवकर पाठ सोडत नाही. म्हणूनच हा एक उपाय करून बघा. लवकर आराम मिळेल.

Home remedies for dry cough, how to get rid off dry cough, Ayurvedic solution for dry cough  | सतत खोकला आणि घशात खूप खवखवतं? १ सोपा उपाय, उबळ-खवखव होईल कमी

सतत खोकला आणि घशात खूप खवखवतं? १ सोपा उपाय, उबळ-खवखव होईल कमी

Highlightsखोकल्याचा त्रास होत असेल तर त्यावर एक सोपा घरगुती उपाय करून बघा.

थंडीचे दिवस आले की सर्दी- खोकला, कफ असा त्रास अनेक जणांना सुरू होतो. एकदा का सर्दी- खोकला झाला की एकवेळ सर्दी तरी २- ३ दिवसांत बरी होते. पण काही जणांचा खोकला मात्र लवकर पाठ सोडतच नाही. कितीही उपाय केले तरी जाता जात नाही. खोकून खोकून अक्षरश: छातीच्या बरगड्या दुखू लागतात. असा खोकल्याचा त्रास (Ayurvedic solution for dry cough) होत असेल तर त्यावर एक सोपा घरगुती उपाय करून बघा. (Home remedies for dry cough)

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय
१. हा उपाय डॉ. मिहीर खत्री यांनी vaidya_mihir_khatri या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ते म्हणतात की खोकला सुरू झाल्यावर आपण हळद, आलं, गूळ असे काही पदार्थ घेतो आणि घरगुती उपाय करून पाहतो. पण त्याने म्हणावा तसा फरक पडत नाही. किंवा कफ कमी झाला तरी खोकला मात्र जशाला तसाच असतो.

सारखी ॲसिडिटी, छातीत जळजळ? ८ सोपे घरगुती उपाय, चटकन मिळेल आराम

२. म्हणूनच अशावेळी हा एक उपाय करून बघा. यासाठी आपल्याला ५ वेलची, अर्धा टीस्पून कोमट तूप आणि अर्धा टीस्पून खडीसाखरेची पावडर असं साहित्य लागणार आहे.

३. सगळ्यात आधी तर वेलचीची पूड करून घ्या. त्यात तूप आणि खडीसाखरेची पावडर घाला. हे चाटण दिवसांतून ३ ते ४ वेळा घ्या. एका दिवसांतच चांगला फरक दिसून येईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

 

हा उपायही करून बघा...
वरील चाटण तर घ्यावेच पण खोकला लवकर कमी होण्यासाठी आणखी २ उपाय करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. ते उपाय म्हणजे...

अंकिता लोखंडे लग्नानंतर वर्षभराने गेली हनिमूनला, म्हणाली नात्यातला रोमान्स कायम ठेवायचा तर दर ३ वर्षांनी.....

१. मोहरीचं तेल थोडं गरम करा आणि त्या गरम तेलाने घशाला बाहेरून मसाज करा. 

२. खोकला असेपर्यंत शक्यतो कमी किंवा आवश्यक तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करा. 

 

Web Title: Home remedies for dry cough, how to get rid off dry cough, Ayurvedic solution for dry cough 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.