Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवल्यानंतर पोट फुगतं-आंबट ढेकर येतात? १ उपाय करा, पोट साफ होईल-गॅस होणार नाही

जेवल्यानंतर पोट फुगतं-आंबट ढेकर येतात? १ उपाय करा, पोट साफ होईल-गॅस होणार नाही

Home Remedies For Gas And Acidity : पोटाच्या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे अपचनाचीही समस्या टाळता येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 23:01 IST2024-12-08T22:58:59+5:302024-12-08T23:01:13+5:30

Home Remedies For Gas And Acidity : पोटाच्या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे अपचनाचीही समस्या टाळता येते.

Home Remedies For Gas And Acidity : Gas And Acidity Home Remedies | जेवल्यानंतर पोट फुगतं-आंबट ढेकर येतात? १ उपाय करा, पोट साफ होईल-गॅस होणार नाही

जेवल्यानंतर पोट फुगतं-आंबट ढेकर येतात? १ उपाय करा, पोट साफ होईल-गॅस होणार नाही

असे बरेच लोक आहे ज्यांना जेवण केल्यानंतर अस्वस्थता वाटते. तर कधी जेवण केल्यानंतर पोटात वेदना होऊ लागतात तर कधी गॅस होऊ लागतो. अपचनाच्या  त्रासामुळे पोटात गडबड होते आणि गॅस तयार होतो, आंबट ढेकर येतात. पोटाच्या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे अपचनाचीही समस्या टाळता येते. (Home Remedies For Gas And Acidity)

१) बेकींग सोडा

अपचनाचा त्रास झाल्यास बेकिंग सोडा पाण्यात घालून पिऊ शकता. यासाठी १ ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून प्या. दुपारच्या जेवणानंतर २ तासांच्या अंतरानं बेकींग सोड्याचं पाणी पिऊ शकता. 

२) आलं

आलं एंटी इंफ्लेमटरी गुणांनी परिपूर्ण असते. आल्याचं सेवन केल्यां अपचनाचा त्रास दूर होतो. आल्याच्या सेवनानं गॅस, ब्लोटींग, पोटाच्यावेदना दूर होतात. आलं तुम्ही कच्च खाऊ शकता किंवा आल्याचं पाणी उकळून याचे सेवन करू शकता. तुम्ही आल्याचा चहासुद्धा पिऊ शकता. 

३) एलोवेरा ज्यूस

पोटासाठी एलोवेरा ज्यूस फायदेशीर ठरते. एलोवेरा ज्यूस प्याल्यानं हार्ट बर्न, गॅस, जीव घाबरल्यासारखं होणं या समस्या टाळता येतात. एलोवेरा ज्यूस प्यायल्यानं पोटात एंटी इंफ्लेमेटरी गुण मिळतात. ज्यामुळे पोटातील एसिड प्रोडक्शनसुद्धा कमी होते. 

४) बडिशेपेचे दाणे

अपचनाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ह बडिशेपेच्या दाण्यांचे सेवन करू शकता. बडिशेपेचे दाणे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत  करते. ज्यामुळे पोटाला आराम मिळतो. एक ग्लास पाण्यात  चमचाभर बडिशेपेचे दाणे घालून प्यायल्यानं पोटाच्या त्रासापासून आराम मिळतो. तुम्ही हवंतर बडीशेपेच्या एसेंशियल ऑईल एक कप पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. 

५) व्हिनेगर

एक ग्लास पाण्यात २ चमचे एप्पल साडयर व्हिनेगर पिऊ शकता. हे पाणी प्यायल्यास अन्न पचण्यास मदत होते. व्हिनेगर पाणी मिसळून प्यायल्यानं शरीराला फायदे होतात आणि तब्येतही चांगली राहते. वजन कमी होत आणि मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते. 

Web Title: Home Remedies For Gas And Acidity : Gas And Acidity Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.