Join us   

अन्न लवकर पचत नाही? पोट फुगल्यासारखं वाटतं? ५ उपाय, अ‍ॅसिडीटी-गॅसेसपासून मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:38 AM

Home Remedies for Getting Relief From Acidity : पोटातील गॅस्ट्रीक एसिडची सामान्य रेंज  १.५ ते ३.५  इतकी आहे. या स्थितीला Hypochlorhydria असं म्हटलं जातं.

पावसाळ्यात पोटाचे विकार बरेच उद्भवतात. अन्न लवकर पचत नाही, सतत गॅस होणं, भूक नसताना खाणं यामुळे गॅस, पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. वेळीच या  आजारांकडे लक्ष दिलं नाही तर गंभीर समस्या उद्भवण्याचाही धोका असतो. खाल्ल्लेलं अन्न पचवण्यासाठी गॅस्ट्रिक ॲसिडची आवश्यकता असते. ज्याला  गॅस्ट्रिक ज्यूस असंही म्हणतात. (Quick Remedies to Get Rid of Acidity at Home) . पोटातील गॅस्ट्रीक एसिडची सामान्य रेंज  १.५ ते ३.५  इतकी आहे. या स्थितीला Hypochlorhydria असं म्हटलं जातं. ज्यामध्ये अपचन आणि गॅस्ट्रीक संबंधित लक्षणांचा सामना करावा लागतो. आहारतज्ज्ञ  शिखा गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Home Remedies for Getting Relief From Acidity)

व्हिनेगर

व्हिनेगर पचनाच्या संबंधित समस्यांसाठी एक उत्तम उपाय आहे. यामुळे पचन सुधारते. रोज जेवताना १ चमचा एपल सायडल व्हिनेगर घ्यायला हवं.

लिंबाचा रस

जर तुम्हाला पचनाशीसंबंधित समस्या असतील तर आहारात लिंबाचा समावेश करा. लिंबाचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त तुम्ही आल्याच्या रसाचेही सेवन करू शकता. 

 

साखरेचे सेवन

साखरेचं सेवन एसिड कमी होण्याचं एक मुख्य कारण आहे. टोमॅटोच्या चटणीमध्ये साखर घातल्यानं संतुलन राहण्यास मदत  होते.

 

ताण-तणाव

तणाव हे अपचनाचे प्रमुख कारण आहे आणि ते गॅस्ट्रिक ऍसिड स्राव रोखण्याचे काम करते. त्यामुळे तणाव टाळण्याचा प्रयत्न करा आणि दररोज पुरेशी झोप घ्या.

चहा-कॉफी प्यायल्याने अ‍ॅसिडीटी होते. चहा किंवा कॉफी कधीही पिऊ नका, विशेषतः रिकाम्या पोटी, धुम्रपानामुळेही अ‍ॅसिडीटी होते, जास्त आणि अनियमित मसालेदार अन्न खाणे, भूक लागल्यावर न खाणे किंवा बराच वेळ उपाशी राहणे, दिवसाच्या कोणत्याही वेळी काहीही खाणं, जेवल्यानंतर लगेच झोप येणे, तेलकट पदार्थ किंवा तेलकट स्नॅक्स खाणे हे देखील अ‍ॅसिडीटीचे कारण आहे. पाणी कमी प्यायल्यानेही अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य