प्रत्येक ऋतूनुसार आपल्या आहारात काही बदल होत असतात आणि त्याचा शरीरावर परिणाम होत जातो. हिवाळ्यात आपला जठराग्नी उत्तम असतो. त्यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया या देखील अगदी व्यवस्थित असतात. त्यामुळे हिवाळ्यात काहीही खाल्लं तरी ते पचतं. मात्र पावसाळ्यात याच्या अगदी उलट असतं. या दिवसांमध्ये जठराग्नी मंद (home remedies for gut health) झालेला असतो. त्यामुळे खाण्यापिण्यात झालेला थोडासा बदलही पचत नाही. लगेचच पोट बिघडते. (solutions for indigestion issue)
शिवाय पावसाळ्यात बाहेरचे चटकमटक पदार्थ खाण्याचा मोहदेखील जरा जास्तच होतो. बाहेर पाऊस भुरभुरायला लागला की लगेचच काही ना काही वेगळं, तळलेलं, तिखट खावंसं वाटतं. या दिवसांत आधीच संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यातून जर हे असे बाहेर गाड्यावर मिळणारे पदार्थ पोटात गेले तर मग पोटाची तर वाटच लागते. पोट बिघडलं की वारंवार ॲण्टीबायोटिक्स घेणंही योग्य नाही. म्हणूनच पचनासंदर्भात पावसाळ्यात काही त्रास जाणवलाच तर तज्ज्ञांनी सांगितलेले हे काही उपाय आधी करून बघा. ते करूनही जर फरक पडला नाही, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हे उपाय आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना सांगितले आहेत.
पचनाच्या वेगवेगळ्या त्रासांवर खास घरगुती उपाय १. अपचन- आयुर्वेदिक CCF चहा हा यावरचा रामबाण उपाय आहे. CCF म्हणजे Cumin, Coriander, Fennel. म्हणजेच जिरे, धने आणि बडिशेप. हे सगळे समप्रमाणात घ्या. एक कप पाणी गॅसवर उकळायला ठेवलं तर त्यात हे सगळे पदार्थ एकेक टि स्पून टाका. ५ ते ७ मिनिटे पाणी चांगलं उकळू द्या. त्यानंतर गाळून घ्या. आणि हा गरमागरम काढा घ्या. अपचनाच्या अनेक समस्या दूर होतील.
२. पोट फुगणे किंवा गुबारणे- ओवा, जिरे, बडिशेप हे सगळं एकेक टीस्पून घ्या आणि एक कप पाण्यात टाकून उकळा. ५ ते ७ मिनिटे उकळल्यानंतर गाळून घ्या. आणि हा गरमगरम काढा प्या.
चहा पिताना त्यासोबत तुम्ही काय खाता? कधीच खाऊ नका ५ गोष्टी; आजारांना घरबसल्या आमंत्रण ३. बद्धकोष्ठता- यासाठी १ टीस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी खा. दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधात १ चमचा तूप किंवा १ चमचा एरंडेल तेल टाका आणि प्या. ४. ॲसिडिटी- १ टीस्पून धने आणि १ टीस्पून बडिशेप एकत्र करा. एक कप पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर हा काढा गाळून घ्या आणि गरम- गरम पिऊन घ्या.
५. भुक मंदावणे- चिमुटभर सुंठ, चिमुटभर मीठ आणि त्यात थोडासा लिंबाचा रस असं चाटण घ्या. पोट बरं होऊन काही तरी खाण्याची इच्छा होईल.
खूप ताण, अति राग यामुळेही होऊ शकतो डायबिटीस, तज्ज्ञांनी सांगितली त्यामागची कारणं ६. नॉशिया- अनेकदा काही खावंसंच वाटत नाही. नॉशिया येतो. हा त्रास कमी करण्यासाठी आलं, पुदिन्याची ६ ते ७ पानं एक कप पाण्यात टाकून ५ ते ६ मिनिटे उकळवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि गरम असतानाच हा काढा प्या. ७. डोकेदुखी- पुदिना किंवा ओव्याचा काढा करून प्या. ८. पोटात आकडा येणे किंवा पोट आखडणे- ओवा, पुदिना, आलं टाकून काढा करा आणि प्या.