उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उष्णतेमुळे घामोळ्यांची समस्या उद्भवते. खासकरून लहान मुलांना घामोळ्या जास्तच होतात. (Summer Remedies) घामोळ्यांची पावडर लावल्यानंतरही २ ते ३ आठवड्यांनी घामोळ्या कमी होतात. त्वचेची आग होणं, जळजळ, खाजेमुळे काहीजणांना कधी एकदा उन्हाळा संपतोय असं होतं. घामोळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. (Home remedies for heat rash home remedies for ghamoriya treatment)
१) 2 ते 3 बर्फाचे तुकडे घ्या आणि एका स्वच्छ सूती रुमालात गुंडाळा. आता या बर्फाच्या तुकड्यांनी घामोळ्या असलेल्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. तुम्हाला त्वरित आराम मिळेल. तुम्ही ही प्रक्रिया दिवसातून दोनदा 5 ते 10 मिनिटांसाठी करू शकता.
२) उन्हाळ्यात खूप गरज असते तेव्हाच घराबाहेर पडा. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि उन्हात बाहेर पडताना शरीर आणि चेहरा स्कार्फने व्यवस्थित झाकून घ्या.
३) घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी थंड दही खूप फायदेशीर ठरते. अर्धा वाटी थंड दह्यात पुदिन्याची पावडर मिसळा. ही पेस्ट त्वचेवर हलक्या हातांनी लावा. थोड्या वेळाने आंघोळ करा. ही पेस्ट दिवसातून दोनदा वापरता येते.
४) एक काकडी किसून त्यात चंदन पावडर मिसळा. नंतर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर घामोळ्या असलेल्या त्वचेवर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर आंघोळ करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल आणि उष्माघातापासून आराम मिळेल
५) पिकलेल्या पपईच्या स्लाईसची पेस्ट बनवा. त्यात गव्हाचे पीठ मिक्स करावे. आता ही पेस्ट घामोळ्यांवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर आंघोळ करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. पपई तुमच्या त्वचेला थंडपणा देईल आणि गव्हाचे पीठ मृत पेशींपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरेल. ही पेस्ट दिवसातून दोनदा वापरू शकता.