Join us   

पोट साफ नसतं, गॅसमुळे दिवसभर अस्वस्थ वाटतं? ५ उपाय-पोट साफ होईल, अपचन होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 2:01 PM

Home remedies for instant relief from constipation : सकाळी नेहमीच्या वेळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि गॅस पास होत राहतो तर कधी मल सुकल्यामुळे पोट साफ लवकर होत नाही.

बिझी लाईफस्टाईल आणि  कायम फास्ट फूड खात राहिल्यामुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. यामुळे वजन वाढण्याबरोबरच पचनाच्या समस्याही उद्भवतात. (Natural Home Remedies For Constipation) सकाळी नेहमीच्या वेळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि गॅस पास होत राहतो तर कधी मल सुकल्यामुळे पोट साफ लवकर होत नाही. (Home remedies for constipation) पोट साफ होत नसेल तर गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  भूक न लागणं, थकवा येणं, कमकुवतपणा, पोटदुखी, उलट्या अशी लक्षणं दिसू येतात. ज्यामुळे तुम्हाला आजारी असल्यासारखे वाटू शकते. (Home Remedies for Instant Relief from Constipation)

कॉन्स्टिपेशनची कारण काय? (Causes of Constipation)

एक्सपर्ट्सच्या मते योग्य प्रमाणात पाणी न पिणं. डाएटमध्ये फायबर्सची कमतरता ही कॉन्स्टीपेशनची मुख्य कारणं आहेत. याव्यतिरिक्त शारीरिक हालचालींची कमतरता यामुळे गॅस होतो.  क्लिवलेंड क्लिनिकच्या रिसर्चनुसार गरोदर महिला किंवा बाळाच्या जन्मानंतर महिलांमध्ये हा त्रास उद्भवू शकतो. हार्मोनल बदलांमुळे हार्ड स्टूल होणं, स्टूल डाऊनची प्रक्रिया संथ होणं असे त्रास  उद्भवतात.

पोट साफ होण्यासाठी उपाय

गरम दुधासह तुपाचे सेवन केल्यास कॉन्स्टिपेशननवर आराम मिळतो.   या उपायाने १५ मिनिटांत मल त्याग होऊ शकतो. यासाठी कोमट दुधात १ चमचा तूप मिसळून प्या. 

जीरं आणि ओवा

जीरं आणि ओव्याचे सेवन पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पोट साफ होण्याबरोबरच एसिडीटी, उलटी होणं, पोटदुखी, यांसारख्या समस्यांवरही आराम मिळतो. यासाठी २ चमचे ओवा २ चमचे जिऱ्यासह वाटून घ्या. यात अर्धा चमचा काळं मीठ घाला. या मिश्रणाचे गरम पाण्यासह सेवन  करा.

मनुके

गॅसची समस्या टाळण्यासाठी मनुक्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते. यासाठी ८ ते १० मनुके पाण्यात भिजवून  ठेवा.  सकाळी  गरम दूधासह याचे सेवन करा. आयुर्वेदानुसार मनुक्यांचे पाणी पोटाच्या समस्यांवर आराम देते. याशिवाय थकवा आणि कमकुवतपणा दूर होतो.

आयुर्वेदीक मसाज

आयुर्वेदात तेल गरम करून केलेली मसाज असरदार मानली जाते.  यासाठी कोमट तेलात ओवा मिसळून पोटाच्या खालच्या भागाची मसाज करा. यामुळे पोटदुखी, गॅस, एसिडीटीची समस्या लवकर बरी होण्यास मदत होईल. गरम तेलात मसाज केल्यानं पोटाच्या नसाही चांगल्या राहतात. 

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी गुणकारी ठरते. हा उपाय करण्यासाठी ओवा, त्रिफला आणि सैंधव मीठ घाला. दिवसातून २ वेळा हे चूर्ण खाल्ल्यानं गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल.

आवळा

आवळा फक्त गॅसपासून आराम देत नाही तर यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या नष्ट करण्याची क्षमता असते. ३ मिली आवळ्याचा ज्यूस १ ग्लास पाण्यासह सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास पचनक्रिया चांगली राहते. 

पालेभाज्या

पालक, स्प्राऊट्स, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या फायबर्सयुक्त असतात. यात फॉलेट आणि व्हिटामीन सी  मोठ्या प्रमाणात असते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य