Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हवा बदलली, घसा खवखव करतोय? ५ उपाय, कोरडा खोकला- खवखवणारा घसा-आवाज बसण्याचा त्रास होईल कम

हवा बदलली, घसा खवखव करतोय? ५ उपाय, कोरडा खोकला- खवखवणारा घसा-आवाज बसण्याचा त्रास होईल कम

Home Remedies for Throat Infection Cough and Cold : घशातच आपण या व्हायरसला अटकाव केला तर तो खाली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 11:13 AM2023-08-31T11:13:56+5:302023-08-31T14:42:55+5:30

Home Remedies for Throat Infection Cough and Cold : घशातच आपण या व्हायरसला अटकाव केला तर तो खाली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Home Remedies for Throat Infection Cough and Cold : If the change of air causes sore throat, do 5 remedies at home; Get instant relief... | हवा बदलली, घसा खवखव करतोय? ५ उपाय, कोरडा खोकला- खवखवणारा घसा-आवाज बसण्याचा त्रास होईल कम

हवा बदलली, घसा खवखव करतोय? ५ उपाय, कोरडा खोकला- खवखवणारा घसा-आवाज बसण्याचा त्रास होईल कम

हवा बदलली की व्हायरल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. लहान मुले, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती आणि वयस्कर व्यक्तींना याचा जास्त प्रमाणात त्रास होतो. व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात ही साधारणपणे घसा खवखवण्यापासून होते. मग हळूहळू सर्दी होणे, डोकेदुखी, ताप, कफ यांसारखी लक्षणे दिसतात. पण सुरुवातीला घसा पॅक झाल्यासारखा वाटतो किंवा खवखवतो. अशावेळी आपल्याला खायला-प्यायला काहीच नको वाटते. घशातून हा व्हायरस खाली फुफ्फुसांपर्यंत जातो आणि मग शरीरात पसरतो. पण घशातच आपण या व्हायरसला अटकाव केला तर तो खाली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यासाठी डॉ. दिक्षा भावसार घरच्या घरी कोणते उपाय करता येतील ते सांगतात (Home Remedies for Throat Infection Cough and Cold)...

१. सुंठ आणि मध 

१ चमचा सुंठ पावडर घ्यायची आणि त्यात १ चमचा मध घालायचा. जेवणाच्या अर्धा तास आधी हे मिश्रण दिवसातून ३ वेळा खायचे. लहान मुलांना पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा मध या प्रमाणात हे मिश्रण द्यावे. 

२. हळद, काळी मिरी आणि मध

१ चमचा हळद घेऊन त्यात चिमूटभर मिरपूड घालायची. यामध्ये मध घालून ते चांगले एकत्र करुन जेवण झाल्यावर अर्धा तासाने दिवसातून २ वेळा घ्यावे. लहान मुलांना देताना याच्या अर्धाच डोस द्यावा. 

३. घशाला आराम देणारे विविध चहाचे प्रकार

- तुळशीचा चहा

- मेथ्या घालून चहा

- आलं-मिंट चहा

- ज्येष्ठमधाचा चहा 

४. गुळण्या करणे

दिवसातून २ ते ३ वेळा हळद आणि मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे घसा बरा होण्यासाठी अतिशय गरजेचे असते. 

५. ज्येष्ठमध आणि मध

१ चमचा ज्येष्ठमधाची पावडर घेऊन त्यात १ चमचा मध घालावा. जेवण झाल्यावर साधारण ४० मिनीटांनी हे मिश्रण घ्यावे. लहान मुलांना अर्धा चमचा पावडर आणि अर्धा चमचा मध या प्रमाणात चाटण द्यावे. हायपरटेन्शन असलेल्यांना ज्येष्ठमध देऊ नये. 

याशिवाय वाफ घेणे, गरम पाणी पिणे, भस्त्रिका, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायम दिवसातून २ वेळा करणे अतिशय गरजेचे आहे. वेळच्या वेळी योग्य ती काळजी घेतल्यास सर्दी आणि कफ कमी होण्यास निश्चितच मदत होते.

Web Title: Home Remedies for Throat Infection Cough and Cold : If the change of air causes sore throat, do 5 remedies at home; Get instant relief...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.