Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात

दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात

Home Remedies For Tooth Worm (Datanchi kid kashi kadaychi) : या तेलामुळे दातांवर जमा झालेले प्लेक, टार्टर नष्ट होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:59 PM2024-03-12T15:59:26+5:302024-03-12T16:15:57+5:30

Home Remedies For Tooth Worm (Datanchi kid kashi kadaychi) : या तेलामुळे दातांवर जमा झालेले प्लेक, टार्टर नष्ट होण्यास मदत होते.

Home Remedies For Tooth Worm : How to Get Rid of Cavity Using Cococnut Oil Home Remedies For Tooth Decay | दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात

दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात

दातांना किड लागणं ही एक सामान्य समस्या आहे. (Dental Care Tips) ओरल  हायजिन खराब असणं, खाण्यापिण्यातील अनियमितता इतर काही कारणामुळे दातांना किड लागते. (Teeth Care Tips) दातांच्या समस्येमुळे फक्त दात किडत नाहीत तर वेदनाही जाणवतात. दातांमध्ये वेदना जाणवणं अनेकदा असहय्य होतं. दातांतील किड काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Get Rid Of Oral Worm) ज्यामुळे कॅव्हिटीज दूर हटवण्यास मदत होईल आणि वेदनांपासूनही आराम मिळेल. नारळाचे तेल आणि लवंग दातांच्या समस्या टाळण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. (Oral Health Tips)

ग्लेन लेक डेंटल केअरच्या रिपोर्टनुसार नारळाच्या तेलाचा वापर करून ऑईल पुलिंग केल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. तोंडातील बॅक्टेरियाज कमी होतात. यातील नॅच्युरल एंटीमायक्रोबियल गुणधर्म दातांना चांगला  परिणाम दर्शवतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या तेलामुळे दातांवर जमा झालेले प्लेक, टार्टर नष्ट होण्यास मदत होते.

दातांवर नारळाचे तेल आणि लवंगाचा वापर कसा करावा?

हा उपाय  घरच्याघरी करण्यासाठी २ चमचे नारळाच्या तेलात २ ते ३ थेंब लवंगाचे तेल घाला. एका स्वच्छ वाटीत नारळाचे तेल काढून घ्या. यात लवंगाचे तेल व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण दात आणि हिरड्यांना लावा. कमीत कमी ५ ते १० मिनिटं तसंच लावून ठेवा. त्यानंतर तोंड स्वच्छ करून पाण्याने गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसभरातून २ वेळा करा. ज्यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

दातांसाठी नारळाचे तेल कसे फायदेशीर ठरते?

नारळाच्या तेलात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास मदत होते. लवंगाचे तेल वेदना निवारक आणि एंटी सेप्टीक गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे दातांतील संक्रमण  कमी होण्यास मदत होते. लवंगात एंटी सेप्टीक गुण असतात. ज्यामुळे दातांतील संक्रमण कमी होण्यास मदत होते. 

हा उपाय करताना सावधगिरी बाळगा

हा उपाय करताना लक्षात घ्या की तुम्हाला नारळाचे तेल किंवा लवंगाच्या तेलाची तुम्हाला कसलीही एलर्जी होणार नाही. दातांमध्ये वेदना जाणवत असतील तर नेहमीच वैदयकीय हेल्प घ्या. दातांमध्ये किड लागणं हे ओरल हायजिनशी संबंधित आहे. रेग्युलर ब्रश करणं, फ्लोसिंग करणं, यामुळे समस्या टाळण्याास मदत होते. 

Web Title: Home Remedies For Tooth Worm : How to Get Rid of Cavity Using Cococnut Oil Home Remedies For Tooth Decay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.