डोकं दुखतंय किंवा डाेकं खूप ठणकतंय ही वाक्य आपण नेहमीच आपल्या मैत्रिणीची, आईच्या, बहिणीच्या तोंडून ऐकत असतो. बऱ्याचदा आपली परिस्थितीही याहून वेगळी नसते. कारण ही डोकेदुखी अशी असते की ती सुरू होण्यासाठी कोणतंही कारण पुरतं. एकदा का डोकं दुखायला लागलं की खरोखरंच काही सुचत नाही. मग काही जणी अशावेळी डोक्याला बाम चोळून, डोकं बांधून सरळ एक झोप काढतात. आणि ज्यांना असं झोपणं शक्य नसतं, त्या मग गोळी घेऊन पुन्हा कामाला लागतात. पण डोकेदुखीसाठी सतत असं मनाने गोळ्या- औषधं घेणं बरं नाही. त्यामुळेच हे काही घरगुती उपाय (Home remedies for headache) आधी करून बघा.
डोकेदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
हे उपाय इन्स्टाग्रामच्या hirayogi या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. उपाय एकदम सोपे आणि अवघ्या ५ मिनिटांत होणारे आहेत.
तडकेवाला गाजर हलवा... एकदा खायलाच हवा, बघा या अस्सल पंजाबी पदार्थाची व्हायरल रेसिपी
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे दोन्ही हातांवर तेल लावा. खोबरेल तेल, बदामाचं तेल असं कोणतंही जे तेल घरात उपलब्ध असेल ते तेल लावावं. तेल नसेल तर शुद्ध तूप लावा. आणि दोन्ही तळहात ३० सेकंदांसाठी एकमेकांवर चोळा.
२. यानंतर करायचा दुसरा उपाय म्हणजे दोन्ही अंगठ्याचा तळहाताच्या बाहेरच्या बाजूचा जो कोपरा असतो, त्या कोपऱ्यावर तळहातांनी चोळा. एका नंतर एक दोन्ही अंगठ्यावर ही क्रिया प्रत्येकी ३०- ३० सेकंंदासाठी करा.
फक्त ३ पदार्थ वापरून घरच्याघरी तयार करा पेरुची जेली, चव अशी की विकतचे जॅम- जेली विसराल
३. यानंतर तिसरी क्रिया म्हणजे उजव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दुमडून खाली वाकवा. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा. डाव्या नाकपुडीने मनातल्या मनात ५ आकडे मोजत श्वास घ्या आणि त्यानंतर १० आकडे मोजेपर्यंत श्वास सोडा. ही क्रिया २ मिनिटांसाठी करावी. या तिन्ही क्रिया एकानंतर एक केल्यास डोकेदुखी कमी होईल.