पोट फुगणं ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. जास्त जेवणं झालं, बाहेरचं खाल्लं किंवा खाण्यात बदल झाला की असा त्रास जाणवतो. पोट फुगण्याबरोबरच पोटदुखीसुद्धा जाणवते. गॅसच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारतज्ज्ञ मनप्रीत बत्रा यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून पोट फुगण्याचा त्रास टाळता येऊ शकतो (Home remedies to relieve stomach bloating and gas instantly) थंडीच्या दिवसात व्यवस्थित पोट साफ होत नसेल तरी तुम्हाला हे उपाय फायदेशीर ठरु शकतात.
जेवण व्यवस्थित चावून खा
आहार तज्ज्ञाच्यामते अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यानं पचनक्रिया व्यवस्थित राहते. पूर्ण पोषण मिळतं. पोट फुगण्याचा त्रास दूर राहतो.
जेवणाच्या ३० मिनिटं आधी लिंबू पाणी घ्या
लिंबू पोटासाठी खूप चांगला आहे. म्हणूनच जेवण करण्यापूर्वी ३० मिनिटे लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी तुमची पचनसंस्था शांत करून पीएच पातळी संतुलित करते.
दही आणि पुदीना
दुपारच्या जेवणात काही पुदिन्याची पाने दह्यात मिसळून खा. हा उपाय तुमच्या पोटातील पाचक एंजाइम सक्रिय करतो आणि पचन सुधारतो.
शरीरातले विषारी घटक बाहेर काढतात ५ पदार्थ; रोज खाल्ले तर होईल बॉडी डिटॉक्स
हिंग
काही डाळींचे सेवन केल्याने पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते. हे टाळण्यासाठी डाळीत चिमूटभर हिंग घाला. हिंगामुळे पचनशक्ती वाढते, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि पोट फुगणं जाणवत नाही
झोपताना गुलकंद खा
रात्री झोपण्याआधी गुलकंद दूधाचे सेवन करा. या घरगुती उपायानं पचनक्रिया व्यवस्थित राहते आमि पीएच लेव्हलसुद्धा संतुलित राहते.