Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरीनला आग, जळजळ होते? युरीन इन्फेक्शन होऊ नये तर न चुकता करा ५ गोष्टी...

युरीनला आग, जळजळ होते? युरीन इन्फेक्शन होऊ नये तर न चुकता करा ५ गोष्टी...

Home remedies to stay away from frequent urine infection : युरीन इन्फेक्शन होऊच नये यासाठी न चुकता करायला हव्यात काही गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 02:25 PM2023-12-04T14:25:21+5:302023-12-04T14:29:05+5:30

Home remedies to stay away from frequent urine infection : युरीन इन्फेक्शन होऊच नये यासाठी न चुकता करायला हव्यात काही गोष्टी...

Home remedies to stay away from frequent urine infection : Urine has fire, burning? Do 5 things without fail to prevent urine infection... | युरीनला आग, जळजळ होते? युरीन इन्फेक्शन होऊ नये तर न चुकता करा ५ गोष्टी...

युरीनला आग, जळजळ होते? युरीन इन्फेक्शन होऊ नये तर न चुकता करा ५ गोष्टी...

हवा बदलली की आपल्या शरीरात बदल होतात. म्हणजेच उन्हाळ्यात आपल्याला सतत तहान लागते आणि युरीनचे प्रमाण कमी होते किंवा युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. हेच थंडीत आपण खूप कमी पाणी प्यायलो तरी थंडीने सतत लघवीला जावे लागते. केवळ हवामानानेच नाही तर लघवीवर इतरही बऱ्याच गोष्टींचा परीणाम होत असतो. आपण घेत असलेला आहार, स्वच्छता, आरोग्याच्या इतर तक्रारी यांचा लघवीवर परीणाम होतो आणि मग आपल्याला युरीनशी निगडीत तक्रारी भेडसावतात. कधी लघवी करताना खूप जळजळ होते तर कधी खालच्या भागाला काही इन्फेक्शन असेल तर खाज येते. लघवीचा रंग बदलणे, लघवी खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात होणे अशा बऱ्याच तक्रारी भेडसावतात (Home remedies to stay away from frequent urine infection). 

बऱ्याचदा आपण या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्या वाढत जातात. पण असे होऊ नये अशावेळी नेमके कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे हे समजण्यासाठी  लघवीची चाचणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर उपचार ठरवतात आणि औषधोपचार करतात. पण औषधोपचार करण्याची वेळ येऊ नये आणि युरीन इन्फेक्शन होऊच नये यासाठी नियमितपणे काही गोष्टी केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. आहारतज्ज्ञ रमिता कौर यांनी असं युरीन इन्फेक्शन होऊ नये यासाठी ५  गोष्टी करायला सांगितल्या आहेत, त्या कोणत्या पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. भरपूर पाणी पिणे 

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपली सिस्टीम स्वच्छ होण्यास मदत होते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. लघवीच्या मार्गात काही अडथळे किंवा बॅक्टेरीया असतील तर ते निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

२ . लघवी दाबू नका 

बरेचदा महिला घराबाहेर जाताना किंवा एरवीही सतत लघवी लागेल म्हणून कमी पाणी पितात. इतकेच नाही तर स्वच्छतागृह चांगले नसेल तर लघवी दाबून ठेवतात. मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

३. आहारात प्रोबायोटीक्सचा समावेश

आपल्या शरीराला चांगले बॅक्टेरीया आणि वाईट बॅक्टेरीया अशा दोन्हींची आवश्यकता असते. दही, आंबवलेले पदार्थ यांसारख्या काही पदार्थांतून आपल्याला प्रोबायोटीक्स मिळतात.ज्यातून शरीराला चांगले बॅक्टेरीया मिळतात आणि युरीन इन्फेक्शनपासून आपण दूर राहू शकतो. 

४. व्हिटॅमिन सी 

आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश असणे अनेक कारणांसाठी फायदेशीर असते. यामुळे युरीनमध्ये ठराविक रासायनिक पदार्थांची निर्मिती होते आणि इन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरीयापासून दूर राहण्यासही याचा उपयोग होतो. 

५. लसूण खाणे

लघवीच्या मार्गात होणारा संसर्ग कमी करण्यासाठी लसूण अतिशय प्रभावी असतो. त्यामुळे आहारात लसणाचा आवर्जून समावेश करायला हवा.  


 

Web Title: Home remedies to stay away from frequent urine infection : Urine has fire, burning? Do 5 things without fail to prevent urine infection...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.