Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गारेगार सरबत प्यायल्याने, बर्फाचा गोळा खाल्ल्याने घसा खवखवतो, खोकला झाला? ५ उपाय, पटकन वाटेल बरं..

गारेगार सरबत प्यायल्याने, बर्फाचा गोळा खाल्ल्याने घसा खवखवतो, खोकला झाला? ५ उपाय, पटकन वाटेल बरं..

Home Remedies to Stop a Bad Cough : सर्दी, खोकल्यामुळे तापही येऊ शकतो. यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन थकवा, शारीरिक वेदना जाणवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 05:17 PM2023-04-26T17:17:50+5:302023-04-27T14:14:59+5:30

Home Remedies to Stop a Bad Cough : सर्दी, खोकल्यामुळे तापही येऊ शकतो. यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन थकवा, शारीरिक वेदना जाणवतात.

Home Remedies to Stop a Bad Cough : Natural remedies for cough relief What is the fastest way to cure a cough | गारेगार सरबत प्यायल्याने, बर्फाचा गोळा खाल्ल्याने घसा खवखवतो, खोकला झाला? ५ उपाय, पटकन वाटेल बरं..

गारेगार सरबत प्यायल्याने, बर्फाचा गोळा खाल्ल्याने घसा खवखवतो, खोकला झाला? ५ उपाय, पटकन वाटेल बरं..

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक  आजार उद्भवतात. दिवसभर घामानं त्वचेवर चिकटपणा येतो याशिवाय सुका खोकलाही वाढतो.  हवेशीर खोल्यांमध्ये एसीमध्ये बसल्यानं अनेकदा आजार वाढतात. (What is the fastest way to cure a cough) उन्हाळ्याच्या दिवसात गारवा मिळण्यासाठी थंड पेय, आईस्क्रीमचं सेवन केलं जातं. पण थंड पदार्थ खाल्ल्यानं तब्येत खराब होते. सर्दी, खोकल्यामुळे तापही येऊ शकतो. यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन थकवा, शारीरिक वेदना जाणवतात. (Natural remedies for cough relief)

सुक्या खोकल्यापासून आराम मिळवण्याचे उपाय (Home Remedies to Stop a Bad Cough)

१) हळद, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, घसा खवखवणे आणि सूज दूर करण्याचे काम करते. यामध्ये असलेले कर्क्युमिन श्वसनाच्या आजारांमध्येही फायदेशीर ठरते. घशात जळजळ होऊ नये म्हणून दुधात एक छोटा चमचा हळद मिसळून प्यायल्याने घशाचा संसर्ग बरा होतो. 

२) उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. थंड पदार्थांऐवजी, कोमट किंवा साधे पाणी प्या. याशिवाय घशाच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी दिवसातून दोनदा ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये रोझमेरीची पाने आणि पुदिन्याची पाने देखील टाकू शकता. पुदिन्याची पाने घशात जमा होणारा कफ काढून टाकण्याचे काम करतात.

३) कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कांदा खा. कच्चा कांदा कफाची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. घशासोबतच कच्चा कांदा खाणे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.

छातीचा आकार बेढब दिसतो, स्तन ओघळलेत? ४ सोपे व्यायाम; सुडौल, मेंटेन दिसाल

४) कोरड्या खोकल्याबरोबरच लोकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत वाफ घेणं हा एक उत्तम उपाय आहे. लहान मुले असोत किंवा वडीलधारी व्यक्ती, बहुतेक लोक वैद्यकीय सल्ल्याने नेब्युलायझर देखील वापरतात. यानेही शरीराला लवकर आराम वाटू लागतो.

आंघोळ करताना लघवी रोखून धरण्याची सवय मुत्राशय खराब करते, ५ लक्षणं, चुकीच्या सवयीचे धोके 

५) गुळवेलाच्या पानांपासून ते मुळापर्यंत आणि देठापर्यंत सर्व काही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. गुळवेलाचा रस खोकल्याच्या उपचारात प्रभावी आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही गिलॉयचे सेवन करू शकता. याचे नियमित सेवन शरीराला संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते.

६) आले हे नैसर्गिक अँटी-हिस्टामाइन मानले जाते. आले किसून त्यात मध मिसळून खा. या उपायानं घसादुखीपासून आराम मिळेल.

Web Title: Home Remedies to Stop a Bad Cough : Natural remedies for cough relief What is the fastest way to cure a cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.