Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी पोट साफच  होत नाही? रात्री झोपण्याआधी हा पदार्थ घ्या, लगेच पोट साफ होईल

सकाळी पोट साफच  होत नाही? रात्री झोपण्याआधी हा पदार्थ घ्या, लगेच पोट साफ होईल

Home Remedy To Keep Your Stomach : अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी फास्ट फूड, तळलेले पदार्थ यांमुळे पोट खराब होते, शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास गॅस होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:46 IST2024-12-27T11:40:22+5:302024-12-27T14:46:23+5:30

Home Remedy To Keep Your Stomach : अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी फास्ट फूड, तळलेले पदार्थ यांमुळे पोट खराब होते, शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास गॅस होतो.

Home Remedy To Keep Your Stomach Clean Do this Before Sleeping At Night | सकाळी पोट साफच  होत नाही? रात्री झोपण्याआधी हा पदार्थ घ्या, लगेच पोट साफ होईल

सकाळी पोट साफच  होत नाही? रात्री झोपण्याआधी हा पदार्थ घ्या, लगेच पोट साफ होईल

सकाळी पोट साफ झालं तर शारीरिक आरोग्यच नाहीतर मानसिक आरोग्यही चांगले राहते. जेव्हा आपली पचनक्रिया खराब असते तेव्हा अपचनाच्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे आपला पूर्ण दिवसच खराब होतो आणि कशात मनही लागत नाही. (Health Tips) अनेक दिवस गॅस  झाल्यास पोट साफ न होण्याची समस्या उद्भवते. ज्यामुळे फक्त पोटात दुखतं नाही तर डोकेदुखीच्या वेदनाही उद्भवतात. जर तुम्हाला गॅस, अपचन किंवा अन्य पचनाच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर काही राणबाण घरगुती उपाय करू तुम्ही सकाळी लवकर पोट साफ करू शकता ज्यामुळे दिवसभर ताजंतवानं वाटेल. (Home Remedy To Keep Your Stomach Clean Do this Before Sleeping At Night)

पोट साफ न होण्याचे कारण

अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी फास्ट फूड, तळलेले पदार्थ यांमुळे पोट खराब होते, शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास गॅस होतो. मानसिक ताण आल्यानं पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. झोपण्याचं आणि  उठण्याचं रूटीन फिक्स नसणं यामुळेही पोट खराब होते. 

रात्री झोपण्याच्या आधी हे उपाय  करा

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा. त्यात चुटकीभर मीठ किंवा एक चमचा मध घाला. नंतर झोपण्याआधी या पाण्याचे सेवन करा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील  आणि सकाळी पोट साफ होईल.
त्रिफळा चूर्ण आयुर्वेदातील एक अद्भूत औषध आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात १ ते २ चमचे त्रिफला चूर्ण प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहील आणि आतड्यांमधली घाण निघून जाण्यास मदत होईल.

एक ग्लास दूधात किंवा कोमट पाण्यात १ ते २ चमचे इसबगोल मिसळून प्यायल्यानं गॅस होणार नाही. याशिवाय आतडे साफ होण्यासही मदत होईल. मल त्याग करणं सोपं होईल. एक चमचा ओवा आणि एक चमचा बडिशेप एक ग्लास पाण्यात उकळवून घ्या. नंतर गाळून झोपण्याआधी या पाण्याचे सेवन करा.

केस पिकलेत-डाय कमी वयात लावण्याची भिती वाटते? १ उपाय, काळेभोर-दाट होतील केस

ज्यामुळे गॅस, अपचनाचा त्रास दूर होईल आणि पोट साफ राहील. एक ग्लास गरम दूधात एक चमचा तूप मिसळून प्या. रात्री झोपण्याआधी या दुधाचे सेवन करा. ज्यामुळे आतडे चांगली राहतील. सकाळी मल त्याग करणं सोपं होईल.

१) सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या.

२) आपल्या अन्नात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश  करा. जसं की फळं, भाज्या, डाळींब.

रोज ब्रश करूनही दात पिवळेच? केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

३) रोज ३० मिनिटं योगा किंवा हलका व्यायाम करा.

४) वेळेवर जेवा,  मसालेदार पदार्थांचे सेवन करू नका.

Web Title: Home Remedy To Keep Your Stomach Clean Do this Before Sleeping At Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.