Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Home Tips : फक्त कपडेच नाहीतर या वस्तू वॉशिंग मशिनमध्ये होतील चकचकीत स्वच्छ; नक्की ट्राय करून पाहा

Home Tips : फक्त कपडेच नाहीतर या वस्तू वॉशिंग मशिनमध्ये होतील चकचकीत स्वच्छ; नक्की ट्राय करून पाहा

Home Tips : तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये स्वयंपाकघरातील क्लिनिंग मॅट्स, हातमोजे किंवा इतर रबरच्या वस्तू देखील स्वच्छ करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:37 PM2022-01-26T17:37:02+5:302022-01-26T17:52:57+5:30

Home Tips : तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये स्वयंपाकघरातील क्लिनिंग मॅट्स, हातमोजे किंवा इतर रबरच्या वस्तू देखील स्वच्छ करू शकता

Home Tips : Apart from clothes washing machine also wash these unusual things | Home Tips : फक्त कपडेच नाहीतर या वस्तू वॉशिंग मशिनमध्ये होतील चकचकीत स्वच्छ; नक्की ट्राय करून पाहा

Home Tips : फक्त कपडेच नाहीतर या वस्तू वॉशिंग मशिनमध्ये होतील चकचकीत स्वच्छ; नक्की ट्राय करून पाहा

आजकाल बहुतेक घरांमध्ये कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये काय धुता येते आणि काय धुता येत नाही हे माहित नसते.  कपड्यांव्यतिरिक्त घरातल्या वापराच्या अनेक वस्तू वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या जाऊ शकतात (Home Tips)  त्याचा योग्य वापर केल्यास तुमची अनेक कामे सोपी होतील. या लेखात, आम्ही तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या गोष्टी धुवल्या जाऊ शकतात हे सांगणार आहोत (Apart from clothes washing machine also wash these unusual things)

कापडाच्या पिशव्या

तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये स्वयंपाकघरातील क्लिनिंग मॅट्स, हातमोजे किंवा इतर रबरच्या वस्तू देखील स्वच्छ करू शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भाजीची पिशवी वॉशिंगमध्येही स्वच्छ करू शकता. जर तुम्ही कॉटनची पिशवी वापरत असाल तर तुम्ही ती कपड्यांसोबत वॉशिंग मशिनमध्ये धुवायला ठेवू शकता.

स्निकर्स

तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कॅज्युअल शूज किंवा स्नीकर्स देखील धुवू शकता. स्नीकर्स तासनतास हाताने धुऊनही नीट स्वच्छ होत नाहीत. यावेळी आपण ते सामान्य पाण्याने वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करू शकता. लक्षात ठेवा की स्नीकर्स धुताना, वॉशिंग मशीन स्लो मोडवर ठेवा.

योगा मॅट

जर तुम्ही रोज योगा मॅट वापरत असाल तर ती स्वच्छ ठेवणंही महत्वाचं असतं. बरेच लोक तासनतास हाताने धुत राहतात पण ते नीट स्वच्छ होत नाही.  तुम्ही ते वॉशिंग मशीनमध्ये कोमट पाण्यात धुवू शकता. वॉशिंग मशिनमध्ये योगा मॅट धुणं पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे त्याची क्वालिटी खराब होणार नाही.

हेअर एक्सेसरिज

तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये कॅप्स, केसांचे रबर्स किंवा केसांच्या इतर वस्तू धुवू शकता. या गोष्टी वॉशिंग मशिनमध्ये ठेवा आणि सौम्य सायकल मोडवर चालवा. ते धुण्यासाठी गरम पाण्याची गरज नाही. केसांच्या वस्तूंमध्ये कागदासारखे पदार्थ  असतील तर त्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका अन्यथा लवकर खराब होतील. 

माऊस पॅड, टेबल क्लोथ्स

सध्या बहुतेक लोक घरून काम करत आहेत. अशावेळी टेबलवरील सर्व कपडे स्वच्छ असणं गरजेचं असतं. माऊस पॅड, टेबल क्लोथ्समध्ये अडकलेली धूळ साफ करण्यासाठी आपण वॉशिंग मशीनचा वापर करू शकता. 

Web Title: Home Tips : Apart from clothes washing machine also wash these unusual things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.