Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Home Tips : कपडे धुतल्यानंतर डिटर्जेंटचं पाणी निरूपयोगी समजून फेकून देता? 'असा' करा साबणाच्या पाण्याचा वापर

Home Tips : कपडे धुतल्यानंतर डिटर्जेंटचं पाणी निरूपयोगी समजून फेकून देता? 'असा' करा साबणाच्या पाण्याचा वापर

Home Tips : कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण  फेकण्याऐवजी तुम्ही बाथरूमचा फ्लोअर स्वच्छ करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:03 PM2022-02-06T14:03:34+5:302022-02-06T14:11:54+5:30

Home Tips : कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण  फेकण्याऐवजी तुम्ही बाथरूमचा फ्लोअर स्वच्छ करू शकता.

Home Tips : Cleaning Tips Different reuse of waste detergent solution | Home Tips : कपडे धुतल्यानंतर डिटर्जेंटचं पाणी निरूपयोगी समजून फेकून देता? 'असा' करा साबणाच्या पाण्याचा वापर

Home Tips : कपडे धुतल्यानंतर डिटर्जेंटचं पाणी निरूपयोगी समजून फेकून देता? 'असा' करा साबणाच्या पाण्याचा वापर

(Image Credit- jewelersmutual)

रोजच्या रोज कपडे धुणं हा सामान्य दिनचर्येचा भाग आहे. (Cleaning Tips and tricks) कपडे स्वच्छ करताना पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, सोबतच डिटर्जंट पावडरचाही वापर केला जातो. मात्र, कपडे साफ केल्यानंतर उरलेले डिटर्जंटचे द्रावण अनेकदा फेकून दिले जाते. (Home Easy Cleaning Tips) उरलेलं डिटर्जंट द्रावण केवळ एकच नव्हे तर अनेक कामांसाठी वापरले जाऊ शकते. आज या लेखात तुम्हाला कपडे धुतल्यानंतर उरलेल्या  साबणाच्या पाण्याचा वापर कसा करता येईल याबाबत सांगणार आहोत जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि घरही स्वच्छ होईल.(Different reuse of waste detergent solution)

बाथरूमची फरशी स्वच्छ करा

कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट द्रावण  फेकण्याऐवजी तुम्ही बाथरूमचा फ्लोअर स्वच्छ करू शकता. यासाठी उरलेल्या द्रावणात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळा. नंतर द्रावण जमिनीवर थोडं थोडं घालून क्लिनिंग ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे पाण्याचीही बचत होईल आणि साबणाचं पाणीसुद्धा वाया जाणार नाही.

किटकनाशक स्प्रे बनवा

उरलेला साबण किंवा डिटर्जंट द्रावणापासून एक उत्तम कीटकनाशक स्प्रे देखील बनवता येतो. जर तुम्हाला बागकामाची आवड असेल आणि कीटकांमुळे फळांचे तसेच फुलांचे अधिक नुकसान होत असेल, तर तुम्ही घरगुती कीटकनाशक फवारणी करून झाडांवर फवारू शकता. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

प्रथम, उरलेल्या डिटर्जंट द्रावणात एक ते दोन चमचे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला आणि ते चांगले मिसळा. आता या मिश्रणात एक ते दोन कप जास्तीचे पाणी घालून मिक्स करा. सर्व घटक मिसळल्यानंतर ते स्प्रे बाटलीत भरून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा झाडांवर फवारावे. या पाण्यानं फवारणी केल्याने झाडाला कधीच किड लागणार नाही.

टॉयलेट सीट स्वच्छ करा

कपडे साफ केल्यानंतर जास्त प्रमाणात डिटर्जंट द्रावण शिल्लक राहिल्यास, ते फेकून देण्याऐवजी तुम्ही टॉयलेट सीट देखील स्वच्छ करू शकता. डिटर्जंट इतर टॉयलेट क्लीनरपेक्षा कमी प्रभावी असले तरी ते काही प्रमाणात स्वच्छ करू शकते. उरलेल्या डिटर्जंट सोल्युशनमध्ये बेकिंग सोडा घाला. या मिश्रणाने टॉयलेट सीट साफ केल्याने सीट पुन्हा स्वच्छ होऊ शकते. या मिश्रणाचा वापर करून तुम्ही वॉश बेसिन देखील स्वच्छ करू शकता.

ड्रेन फ्लाय किटकांना दूर करा

घरात बरेच उडणारे किटक येतात. डिटर्जंट सोल्यूशनच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. याचा वापर केल्याने बाथरूमपासून ते स्वयंपाकघरात जाणारे ड्रेन फ्लाय किडे पळून जातील. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-
सर्व प्रथम, उरलेल्या डिटर्जंट द्रावणात तीन ते चार चमचे व्हिनेगर घाला आणि ते चांगले मिसळा. तुम्हाला हवे असल्यास या मिश्रणात कडुलिंबाचे तेल किंवा बेकिंग सोडा देखील मिक्स करू शकता. घटक मिसळल्यानंतर, ड्रेन फ्लायवर फवारणी करा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा. 20 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. तुम्हाला दिसेल की ड्रेन फ्लाय आता त्या ठिकाणी येत नाही.

दागिने स्वच्छ करा

उरलेल्या डिटर्जंट द्रावणानेही तुम्ही दागिने स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला या द्रावणात दुसरे काहीही मिसळण्याची गरज नाही. यासाठी  दागिने या पाण्यात टाका आणि काही वेळ राहू द्या आणि काही वेळाने सॉफ्ट क्लिनिंग ब्रशने दागिने स्वच्छ करा. या मिश्रणाने मौल्यवान दागिने साफ करणे टाळावे.

बुट स्वच्छ करा

कपडे धुतल्यानंतर उरलेलं साबणाचं पाणी बूट स्वच्छ करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. जर बुट खूपच घाणेरडे झाले असतील तर  या मिश्रणात एक ते दोन चमचे अतिरिक्त डिटर्जंट आणि पाणी घालून मिश्रण तयार करा आणि या मिश्रणात बूट सुमारे 30 मिनिटे सोडा. 30 मिनिटांनंतर, शूज स्वच्छ ब्रशने घासून स्वच्छ करा.
 

Web Title: Home Tips : Cleaning Tips Different reuse of waste detergent solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.