Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:23 PM2021-09-22T15:23:41+5:302021-09-22T15:25:10+5:30

Home Tips : जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 

Home Tips : Stop using so much laundry detergent report says about indian remedy to washing clothes | Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

Home Tips : कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

वाशिंग मशीन किंवा हातानं कपडे धुतानाही डिटर्जेंटचा वापर अनेक महिला करतात. साबण किंवा डिटर्जेंटचा वापर कपड्यांवरील डाग, मळकटपणा, दुर्गंधी काढून टाकण्यासाठी केला जातो. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करत असाल तर त्यामुळे एक  वेगळी अस्वच्छता निर्माण होते. याकडे फारसं लक्ष  दिलं जात नाही. 
लोकांना वाटतं की डिटर्जेंट पावडर पाण्यात पूर्णपणे विरघळते.

पण प्रत्यक्षात असं होत नाही. त्याचे कण त्या कपड्यांना चिकटतात.  त्याचा तुमच्या बाकीच्या कपड्यांवरही परिणाम होतो. इस्त्री करताना कपडे चिकटणे हे जास्त साबण किंवा पावडरचा वापर झाल्याचे संकेत देतात. अभ्यासानुसार यामुळे कपड्याच्या वजनावर परिणाम होऊन कपड्याचे वजन वाढते. 

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, डिटर्जेंट ब्रॅण्ड टाइडचा अहवाल असेही म्हणतो की जास्त डिटर्जेंट वापरणे योग्य नाही. तुम्ही जितके डिटर्जंट वापरता तेवढे ते कापड गलिच्छ होण्याची शक्यता जास्त असते.

किती प्रमाणात डिटर्जेंटचा वापर करायचा?

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या ६ किलो क्षमतेच्या वॉशिंग मशिनमध्ये सुमारे १२ पौंड वजनाचे कपडे म्हणजे सुमारे ५.५ किलो वजनाचे कपडे ठेवले तर ते चांगले धुतले जाण्यासाठी फक्त 2 चमचे डिटर्जेंट पुरेसे आहे. जर कपड्यांचे वजन आठ पौंडपेक्षा कमी असेल तर फक्त १ चमचा डिटर्जेट घालावे.

सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

अभ्यासाच्या लेखकांच्या मते, 'काही ब्रँड चांगल्या परिणामांसाठी त्यांच्या उत्पादनांमध्ये किती पावडर वापरावी याचा उल्लेख करतात. अशा परिस्थितीत, असे होऊ शकते की त्यांची जाहिरात प्रति लोड दोन चमचे पुरेसे असताना 2 चमच्यांपेक्षा जास्त पावडर वापरण्याची शिफारस करू शकतात. अशा स्थितीत आपण कोणतं डिटर्जेंट वापरत आहोत, किती प्रमाणात वापर करतोय. याकडे लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही  High Efficiency (HE) डिटर्जेंटचा वापर करत असाल तर तुम्ही वापर करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

वायरकटर या प्रकरणात द्रव डिटर्जेंटची शिफारस करते. कारण ते पाण्यात सहज मिसळते. व्हर्लपूल कंपनीने व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणानं घाण कपडे धुण्याची शिफारस केली आहे. यासाठी, दोन चमचे डिटर्जंट घेण्याऐवजी, प्रथम बादलीमध्ये 1 चतुर्थांश पाणी भरा आणि त्यात एक कप व्हिनेगर घाला, नंतर त्यात घाणेरडे कपडे बुडवा. काही वेळानंतर, जर कोणताही डाग खूप खोल असेल तर त्याला द्रव डिटर्जेंटघने घासून घ्या आणि नंतर सामान्य प्रमाणात डिटर्जेंट वापरून वॉशिंग मशीन सुरू करा.

Web Title: Home Tips : Stop using so much laundry detergent report says about indian remedy to washing clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.