आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणांतर बडीशेप खाण्याची सवय असते. खरंतर बडीशेपमध्ये, अनेक औषधी गुणधर्म असतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन - सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज आढळतात. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेप खाणे आवश्यक असते, कारण बडीशेपमुळे फक्त एक नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. बडिशेपमध्ये सुगंध आणि अँटीबॅक्टिरियल गुणधर्म दोन्ही असतात. बडीशेपमध्ये अनेक जीवनसत्त्वांसोबत विविध खनिजे देखील असतात. पोटभर जेवण केल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते.
आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास जाणवताना दिसतो. काही लोकांना पोटांत गॅस होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. काहीवेळा खूप हेव्ही जेवण झाल्यानंतर आपल्याला करपट ढेकर, पोटात गॅस, पोटदुखी, पोटात जळजळ होणे यांसारख्या विविध समस्या उद्भवतात. मुखवास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसते. जेवणानंतर पोटात गॅस होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. अनेकांना रोज जेवणानंतर पोटात गॅस होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी आपण आपल्या रोजच्या बडीशेपमध्ये काही खास पदार्थ मिसळून अशी बडीशेप रोज खाल्ल्यास गॅसची ही समस्या लगेच दूर होण्यास मदत होते(Gas And Bloating Troubling You? Try Home Remedy For Gas).
साहित्य :-
१. ओवा - २ टेबलस्पून
२. जिरे - २ टेबलस्पून
३. बडीशेप - २ टेबलस्पून
४. जवस - २ टेबलस्पून
५. काळ मीठ - १ टेबलस्पून
इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....
बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...
कृती :-
१. सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यामध्ये ओवा, जिरे, बडीशेप, जवस घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावेत.
२. ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण कोरडे भाजून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात काळं मीठ घालावे.
३. आता हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे.
४. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण गार होईपर्यंत तसेच ठेवावे.
५. ही बडीशेप गार झाल्यावर एका हवाबंद डब्यांत व्यवस्थित भरुन स्टोअर करून ठेवावी.
जेवण झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित पचन व्हावे, जेवणानंतर पोटात गॅस होऊ नये म्हणून एक चमचा ही बडीशेप जेवणानंतर खावी.