सध्याच्या काळात लठ्ठपणामुळे अनेकजण त्रस्त आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ऑफिसला जाणाऱ्या अनेक महिलांना लठ्ठपणाचा त्रास होतो. लठ्ठपणाचा त्रास कमी करण्याच्या लोक प्रयत्नात असतात. पुरूषांपासून महिलांनाही शरीराच्या वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जास्त वर्कआऊट करावा लागतो. ( What Are The Risks And Benefits Of Drinking Cold Water) इतंकच नाही तर वजन कमी करण्यासाठी लोक आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करतात. (Hot Or Cold Water Which One Is Better For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचे बदल करतात. काही लोकांचे असे म्हणणे असते की गरम पाणी प्यायल्याने लठ्ठपणा लवकर कमी होतो. इतकंच नाही तर न्युट्रिशनिस्ट जसमीत कौर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून वजन कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे की थंड याबाबत माहिती दिली आहे.
चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढतं का? चपातीला तूप लावाचयं की नाही, तज्ज्ञ सांगतात...
गरम पाणी पिण्याचे फायदे
जेवताना गरम पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि जास्त खात नाही. गरम पाण्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. गरम पाण्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.
थंड पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो. शरीरातील पाण्याचे तापमान गरम करण्यासाठी तुम्ही एनर्जीचा वपर करू शकता ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. थंड पाण्यामुळे तुम्हाला जास्त ताजेतवाने राहण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिता आणि भूकही कमी लागते.
डाळीतून पुरेपूर प्रोटीन मिळण्यासाठी ICMR नं सांगितली डाळ शिजवण्याची योग्य पद्धत, पाहा
वजन कमी करण्यासाठी गरम पाणी फायदेशीर की थंड पाणी
गरम आणि थंड दोन्ही पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. गरम आणि थंड पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. वजन कमी करण्याची प्रक्रिया वाढते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी तुम्ही गरम किंवा थंड दोन्ही प्रकारच्या पाण्याचे सेवन करू शकता.
कारण वजन कमी करण्याच्या प्रभावात जास्त अंतर नसते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियात हायड्रेट राहणं फार महत्वाचे आहे. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने भूक कंट्रोल होते, मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यासही मदत होते.