सध्या जीवनाचा वेग हा दिवसंदिवस वाढत चालला आहे (Health Tips). प्रत्येक जण घाईत असतो. माणसामध्ये संयम नावाचा प्रकार कमी होत चालला आहे. त्यामुळे लोक इन्स्टंट गोष्टींकडे अधिक आकर्षित होत आहेत. छोटी भूक भागवण्यासाठी आजकाल बरेच गोष्टी बाजारात उपलब्ध झाले आहेत (Instant Noodles). इन्स्टंट नूडल्सपासून ते प्रीमिक्स. बरेच खाद्यपदार्थ कमी वेळात, कमी मेहनतीत तयार होतात. पण याचे देखील काही दुष्परिणाम आहेत. लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण छोटी भूक भागवण्यासाठी २ मिनिटात तयार होणारे इन्स्टंट नूडल्स खातात. पण याचे काही दुष्परिणाम आहेत.
दिल्लीस्थित आहारतज्ज्ञ अवनी कौल यांनी न्यूट्री अॅक्टिवेनिया या वेबसाईटला माहिती देताना सांगितले की, 'इन्स्टंट नूडल्स खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यात सोडियम, प्रिझर्वेटिव्ह आणि इतर घातक घटक आढळतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित याचे सेवन टाळा. त्याऐवजी हेल्दी पदार्थ खा'(How Bad are Instant Noodles for Your Health?).
ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त
इन्स्टंट नूडल्सचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी, पॅकेजिंगपूर्वी नूडल्स शिजवून तळले जातात. तळण्यासाठी वापरले जाणारे तेल पाम तेल असते. ज्यामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यातील ट्रान्स फॅट्स किंवा सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे वजन वाढीची समस्या वाढते.
१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला
इन्स्टंट नूडल्समुळे पोट बिघडू शकते
इन्स्टंट नूडल्स तयार करण्यासाठी रिफाइंड पिठाचा वापर होतो. मैद्या पोटासाठी चांगला नाही. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. शिवाय बद्धकोष्ठता, अपचन आणि अॅसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे शक्यतो इन्स्टंट नूडल्स टाळा.
MSG आणि TBHQचा वापर
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) ही गोष्ट पदार्थात चव वाढवण्याचे काम करते. तर, टर्शरी-ब्यूटाइल हायड्रोक्विनोन (TBHQ) मुळे लठ्ठपणा आणि चयापचय क्रिया मंदावते. शिवाय उच्च रक्तदाब, अशक्तपणा, छातीत दुखणे, हृदयाच्या निगडीत समस्या यासह इतर समस्या निर्माण होतात. जर आपण अधिक या दोन गोष्टींचे सेवन केले तर, आरोग्याचे अधिक नुकसान होऊ शकते.
किचनमध्ये झुरळांची फौज? बेकिंग सोडा - लवंगांचा सोपा उपाय - मिनिटात झुरळं गायब - घर दिसेल स्वच्छ
हेल्दी आटा नूडल्सचा पर्याय
जर आपल्याला नूडल्स खायची इच्छा झाली असेल तर, आपण घरात हेल्दी आटा नूडल्स तयार करू शकता. अधिक हेल्दी बनवण्यासाठी आपण त्यात भाज्यांचा वापर करू शकता. शिवाय फोडणीसाठी हेल्दी तेलाचा वापर करा. आपण त्यात चीज देखील मिक्स करू शकता. यामुळे शरीराला आटा नूडल्समधून प्रोटीन देखील मिळेल.