अन्नाला आपल्याकडे पूर्णब्रहम मानले जाते. यामुळेच जेवताना आपल्या समोर आलेल्या अन्नाचा मान ठेवून काही नियम तसेच शिस्तीचे पालन करुन आपण ताटातील अन्न संपवतो. जेवताना जमिनीवर बसावे, जेवताना ताठ बसावे, ताटात कोणतेही अन्नपदार्थ टाकू नये, जेवणाला कधीच नाव ठेवू नये, एक घास बत्तीस वेळा चावून खावा, असे जेवणाच्या बाबतीतले अनेक नियम आपण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून कायमच ऐकले असतील(What Happens If You Take a Deep Breath Before Eating).
जेवणाच्या बाबतीतला असाच काहीसा एक खास महत्वपूर्ण नियम डॉक्टर लवलीन कौर यांनी सांगितला आहे. डॉक्टरांच्या मते, जेवण जेवण्याआधी दीर्घ श्वास घेणे आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरते. जेवण करण्याआधी जर आपण काही सेकंद दीर्घ श्वास घेतल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. डॉक्टर लवलीन कौर जेवणाआधी दीर्घ श्वास घेण्यास का सांगतात तसेच याचे नेमके महत्व आणि फायदे काय आहेत ते पाहूयात(How Breathing Before Eating Improve Digestive Health).
१. जेवण करण्याआधी दीर्घ श्वास घेतल्याने नेमके काय होते ?
१. जेवण जेवण्याआधी दीर्घ श्वास घेतल्याने आपले मन आणि शरीर शांत होते. दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीराला आराम मिळाल्याने आपली पचन क्रिया अॅक्टिव्ह होण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या शरीरातील पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढते ज्यामुळे अन्न चांगले पचण्यास मदत मिळते.
२. जेवणाआधी दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि यामुळेच आपली स्ट्रेस, चिंता कमी होते. आपल्या मनातील व डोक्यातील स्ट्रेस कमी झाल्यामुळे आपण जेवणाचा आनंद घेत जेवण जेवू शकतो.
रात्री पाण्यात भिजवा ‘हे’ ५ पदार्थ, सकाळी उपाशीपोटी प्या पाणी- तब्येतीच्या तक्रारीच संपतील...
३. दीर्घ श्वास घेतल्याने आपण काय खाता याविषयी आपल्याच मनात अधिक जागरूकता निर्माण होते. हे तुम्हाला सजगतेने खाण्याची प्रेरणा देते. त्यामुळे जेवणाची चव अनुभवायलाही मदत होते.
४. खोल श्वास घेतल्याने रक्त प्रवाह वाढतो, ऑक्सिजनचा पुरवठा तुमच्या पेशींपर्यंत पोहोचतो आणि यामुळे तुमच्या शरीराला अन्नातून पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...
२. जेवणाआधी दीर्घ श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
जेवणाआधी दीर्घ श्वास घेण्यासाठी सगळ्यात आधी जेवायला बसतो त्याच जागी सरळ स्थितीत आरामात बसा. हळुहळु नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने हळुहळु श्वास सोडा. ही प्रक्रिया किमान ६ वेळा तरी करा त्यानंतर जेवायला सुरुवात करा.