तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.(Benefits of ghee for skin) तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात.(Ghee health benefits) आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.(Ayurvedic uses of ghee)
तुप फक्त खाल्लेच नाही तर ते चेहऱ्यावर देखील लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा ग्लो होण्यास मदत होते तसेच त्वचेचा पोत देखील सुधारतो.(Best way to apply ghee on body) तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, आणि ई असते. तसेच हेल्दी फॅट, कॅल्शियम आणि ओमेगा-३ सारखे गुणधर्म यात असतात. आपल्यापैकी अनेकांना तुप खाण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे. परंतु, शरीराचे काही भाग असे आहेत जिथे तूप लावल्याने असंख्य आजार दूर होतात. जाणून घेऊया कोणत्या शरीराच्या कोणत्या भागावर तूप लावायला हवे.
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? ५ जबरदस्त फायदेही वाचा
1. डोळ्यांमध्ये काजळसारखे तूप लावल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते. यामुळे सतत वापरल्या जाणाऱ्या स्क्रिनमुळे डोळ्यांवरील ताण हलका होतो. जर आपले डोळे सतत कोरडे होत असतील तर तुपाचा वापर करायला हवा. तसेच जर आपल्या डोळ्यांना सतत अंधारी येत असेल तर त्यांना टवटवीत करण्याचे काम देखील तूप करते.
2. नाक हा आपल्या शरीरात महत्त्वाचा अवयव. यातून आपल्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया होते. नाकात तूप घातल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. नाकात श्लेष्मा जमा झाला असेल तर त्वचा ओलसर करण्यासाठी आणि घाण बाहेर करण्यासाठी याचा वापर होतो. सतत चिडचिड होत असेल आणि मानसिक शांतता हवी असेल तर तूप यावर बहुगुणी ठरते.
3. शरीराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नाभी. नाभीमध्ये तूप घातल्याने पाचनाचे आरोग्य चांगले राहाते. पुनरुत्पादक आरोग्यदेखील सुधारते. त्वचा आणि केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तूप नाभीत टाकल्याने फायदा होतो.
4. अनेकदा खूप चालल्यानंतर आपल्या तळपायावर त्याचा अधिक भार येतो. ज्यामुळे त्याची आग होते. तळपायावर तूप घासल्याने डोके शांत होण्यास मदत होते. पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते. तुपामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऊर्जा मिळते.