Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How Can We Sleep Better : काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप

How Can We Sleep Better : काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप

How Can We Sleep Better : ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींना जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, हृदयरोग यांचा समावेश असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 11:44 AM2022-05-27T11:44:33+5:302022-05-27T11:49:10+5:30

How Can We Sleep Better : ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींना जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, हृदयरोग यांचा समावेश असतो.

How Can We Sleep Better? 5 Remedies: Sleep well | How Can We Sleep Better : काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप

How Can We Sleep Better : काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप

Highlightsडोक्यात सतत कसले विचार येत असतील तर ते घालवण्यासाठी आपण वाचन करु शकतो. त्यामुळे रात्रीची झोप शांत लागण्यास मदत होते. झोप शांत झाली तर तब्येत चांगली राहतेच पण मनानेही आपण शांत होतो.

रात्रभराची शांत झोप झाली की दुसरा दिवस चांगला जातो. पण रात्री गाढ आणि शांत झोप येणे हे अनेकांसाठी आव्हान असते. कित्येकदा या कुशीवरुन त्या कुशीवर झाले तरी आपल्याला म्हणावी तशी शांत झोप येत नाही. यामागे अनेक शारीरिक, मानसिक कारणे असतील तरी दिवसाची ६ ते ८ तास झोप उत्तम तब्येतीसाठी आवश्यक असते. दिवसभर आपण इतके धावत असतो. त्या शरीराला आणि मनाला पुरेसा आराम मिळाला नाही तर पुढच्या दिवशी नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा राहत नाही. ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींना जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो (How Can We Sleep Better). यामध्ये डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, हृदयरोग यांचा समावेश असतो. आता चांगली झोप यावी यासाठी काय करायला हवे याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. व्यायाम - आपण दिवसभर बैठे काम करतो. त्यातही खाल्ल्यावरही अनेकदा आपण बसून राहतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होतेच असे नाही. तसेच शरीराला पुरेसा थकवा न आल्याने लवकर झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. शरारीची हालचाल झाली तर गाढ, शांत झोप यायला मदत होते. 

२. कोमट दूध प्या - झोपताना कपभर कोमट दूध प्यायले तर पोटाला शांत वाटते आणि गाढ झोप यायला मदत होते. त्यामुळे रात्री न चुकता कोमट दूध पिऊन मग झोपा. 

३. तेलकट, मसालेदार पदार्थ - झोपताना तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा. या पदार्थांमुळे अपचनाची तक्रार उद्भवू शकते. पचन बिघडले तर अॅसि़डीटीसारख्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे झोपताना हे पदार्थ टाळलेले बरे.

४. चहा-कॉफी - अनेकांना रात्री झोपताना चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. मात्र चहा किंवा कॉफीमुळे रात्रीची झोप उडते. त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी रात्रीच्यावेळी कॉफी पिणे टाळायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

५. झोप येईल असे वातावरण - झोपताना कोमट पाण्याने आंघोळ करुन काही वेळ ध्यान करुन मग झोपावे. यामुळे शांत आणि गाढ झोप येण्यास मदत होते. तसेच आपली झोपायची खोली शांत, हवेशीर असावी. रात्री झोपल्यावर डोक्यात सतत कसले विचार येत असतील तर ते घालवण्यासाठी आपण वाचन करु शकतो. त्यामुळे रात्रीची झोप शांत लागण्यास मदत होते. 

Web Title: How Can We Sleep Better? 5 Remedies: Sleep well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.