Join us   

पाय, पाठदुखीचं कारण ठरतो चुकीच्या चपला वापर; तज्ज्ञांनी सांगितलं योग्य चपला कशा निवडाव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 7:38 PM

How to chose right footwear : स्त्रियांच्या या सवयीमुळे नंतर पाठदुखी आणि पायदुखी होते. 

उंच टाचांच्या चपला सध्याच्या काळात महिलांची पहिली पसंत बनल्या आहेत. पण हाय हिल्सच्या वापरानं पायांपासून पाठीपर्यंत  वेदना जाणवतात. हाडांचे डॉक्टर (सीनियर ऑर्थोपेडिक सर्जन) डॉक्टर सौरव चौधरी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना पायांना त्रास होऊ नये म्हणून कशा चपला निवडाव्यात याबाबत  माहिती दिली आहे. दररोज चुकीच्या चपलांचा नियमित वापर आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतो. जर तुम्ही जास्त वेळ हील्स घालता राहिलात तर काही काळानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्त्रियांच्या या सवयीमुळे नंतर पाठदुखी आणि पायदुखी होते. 

हाय हिल्स वापरत असलेल्या महिलांना कंबरदुखीचा सामना करावा लागतो. सध्या अनेक तरूणी आर्थोपेडिक समस्यांच्या शिकार झाल्या आहेत. हाय हील्स वापरल्यामुळे शरीराची सेंटर ऑफ ग्रेवेटी  बदलते. त्यामुळे मॅकेनिकल पेन होते. शरीराचे मॅकेनिक्स बदलल्यानंतर सांधेदुखी जाणवते. हाय हिल्समुळे गुडघ्यांवर प्रचंड दबाव पडतो. म्हणून टाचांच्या चपला घालणारे अनेकदा गुडघेदुखीची तक्रार करतात.

हाय हिल्समुळे एंकल्स आणि गुडघ्यांवर जास्त परिणाम होतो. जर कोणी सतत हिल्सच्या चपला वापरत असेल तर शरीर पुढच्या बाजूनं वाकलेलं असतं. ज्यामुळे हिप्स आणि रीढमध्ये बदल होतो, लोव्हर बॅक पेनही जाणवते. हिल्सच्या चपलांमुळे शरीराचा भार पंज्याच्या एका बाजूला येतो परिणामी पायांवरचा दबाव वाढतो. 

हाय हिल्समुळे स्पाईनवर कसा परिणाम होतो?

हाय हिल्स घालून चालणं अजिबाबत नॉर्मल नाही. हिल्स घातल्यानंतर पायाचा पंजा वाकतो परिणामी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही परिणाम होतो. हाय हिल्समुळे पंजा, बोटांमध्ये, घोट्यामध्ये, गुडघ्यांमध्ये वेदना होतात. तुम्ही कुठेही मीटिंगमध्ये बसताना शूज सैल करू शकतो आणि पाय जमिनीवर ठेवू शकतो. यामुळे पायांना आराम मिळतो. पाय आराम करण्यासाठी, 20-30 मिनिटांच्या अंतराने विश्रांती घ्या आणि आपले शूज काढा.

शैलीनुसार शूज निवडू नका. 

शूज घालून तुम्हाला किती आराम मिळेल त्याप्रमाणे निवड करा. उंच टाचांमध्ये धावण्याचा कधीही प्रयत्न करू नका. यामुळे पाय मुरगळण्याची शक्यता असते. मुलींचा प्रयत्न असावा, जर त्यांनी टाच घातली असेल तर त्यांना जास्त वेळ घालू नये.

 20-30 मिनिटांच्या अंतराने विश्रांती घ्या आणि आपले शूज काढा. शैलीनुसार शूज निवडू नका. ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतात की चुकीच्या चपला घातल्याने अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. चपला खरेदी करताना त्या किती आरामदायक आहेत हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. चुकीच्या चपला घालणं पायांसाठी तसेच आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

पायांची लांबी, तळव्यांचा आकार लक्षात घेता फुटवेअर्स विकत घ्यायला हवीत. जे फुटवेअर्स तुम्ही वापरता त्याचे  सोल मोठे असायला हवेत. स्टेपवाली सॅण्डल वापरू नका त्यामुळे टांचावर दबाव येऊ शकतो. चांगल्या ब्रांडची चप्पल किंवा सॅण्डल वापरा जेणेकरून साईज आणि शेप लवकर बिघडणार नाही. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य