Join us   

खुप कॉफी पिता, तोंडाला दुर्गंधी, दात खराब? अती कॉफी पिण्याचे ४ दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 1:33 PM

How Coffee Affects Your Oral & Dental Health : सतत कॉफी पिण्यामुळे तुमच्या ओरल व डेंटल हेल्थवर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतील.

दिवसभरात कामाचा थकवा दूर करून फ्रेश राहण्यासाठी कॉफीचे सेवन करण्याची आपल्याला सवय असते. खासकरून या थंडीच्या दिवसात आपण फक्त सकाळीच नाही तर दिवसातून दोन - तीन वेळा कॉफी पितोच. रोजच्या रुटीनमध्ये, अभ्यास करताना, मीटिंग्समध्ये असताना, मित्र - मैत्रिणींसोबत वेळ घालवताना आपल्याला कॉफी पिण्याची इच्छा होतेच. जर तुम्ही दिवसातून योग्य प्रमाणांत कॉफी पित असाल तर ठीक आहे; परंतु जर कॉफीचे अतिसेवन होत असेल तर ते तुमच्या ओरल हेल्थला हानी पोहोचवू शकत (How Coffee Affects Your Oral & Dental Health).

पण तुम्हाला हे माहित आहे का? कॉफीच्या अतिसेवनाने तुमची ओरल हेल्थ बिघडू शकते...  

१. दातांवर कॉफीचे डाग दिसू शकतात - तुम्ही कॉफीचे जास्त सेवन करत असाल तर हळू हळू तुमच्या दातांवर त्यांचे डाग दिसू लागतील. आपल्या दातांवर असणाऱ्या इनॅमलच्या थरामध्ये काही सूक्ष्म छिद्रे असतात. चहा - कॉफी, कोल्डड्रिंक्स यांसारख्या पेयांचा सतत मारा केल्यास तुमच्या दातांवर त्यांचे डाग दिसू लागतील. 

२. तोंड सतत कोरडे पडणे - उत्तम ओरल हायजिनसाठी लाळ हा एक अतिमहत्वपूर्ण घटक आहे. लाळेमुळे आपल्या तोंडात एक प्रकारचा ओलावा टिकून राहतो. या लाळेमुळे तोंडाला हानी पोहोचविणाऱ्या बॅक्टेरिया व फूड पार्टिकल्सपासून आपले संरक्षण केले जाते. लाळेमध्ये असे काही महत्वाचे मिनरल्स असतात की जे इनॅमलच्या बांधणीसाठी महत्वाचे असतात. पण जेव्हा तुम्ही कॉफीचे आधी सेवन करता तेव्हा तुमचे तोंड कोरडे पडण्यास सुरुवात होते व लाळेचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. जेव्हा तुमची लाळ तयार होण्याची प्रक्रिया थांबते तेव्हा, हिरड्यांना सूज किंवा जळजळ होणे व जिभेला जखमा होण्याची शक्यता जास्त असते. लाळ निर्माण करणार्‍या ग्रंथी पुरेशी लाळ निर्माण करू शकत नसल्यास तोंडामध्ये शुष्कता निर्माण होते.

३. डेंटल डिसऑर्डर - कॅफेनयुक्त कॉफीचे अधिक सेवन केल्यास नर्वस सिस्टमवर याचा परिणाम दिसून येऊ शकतो. नर्वस सिस्टमवर ताण आल्यामुळे ब्रुक्सिज्म सारख्या अन्य डेंटल डिसऑर्डरचा सामना करावा लागतो.  

४. दातांवरील इनॅमलच्या थरांचे होऊ शकते नुकसान - कॉफीमध्ये असणाऱ्या विविध घातक घटकांमुळे तुमच्या दातांवरील इनॅमलचा थर नष्ट होऊ शकतो. हा थर नष्ट झाल्यास, काही फूड पार्टिकल्स आणि बॅक्टेरिया दातांमध्ये अडकून राहू शकतात. जेव्हा हे बॅक्टेरिया दात आणि हिरड्यांच्या टिश्यूमध्ये जाऊन अडकतात तेव्हा कॅव्हिटीज सारखे हिरड्यांचे गंभीर आजार होऊ शकतात.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सदातांची काळजी