डायबिटीस एक असा आजार आहे जो आता वृद्धांपूरता मर्यादीत न राहता तरूण वयोगटातील लोकांनाही आपलं शिकार बनवत आहे. मागच्या दोन वर्षात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे डायबिटीसच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली पाहायला मिळाली. डायबिटीस झाल्यानंतर इतर आजाराही शरीरावर सहज आक्रमण करू शकतात.
घरोघरच्या स्त्रिया कामाच्या नादात किंवा ऑफिसला जायची घाई असल्यासं नाश्त्याला एव्हढ महत्व देत नाहीत. नाश्ता केला तर केला नाही. कधीकधी नुसत्या चहा किंवा कॉफीवर आणि २ बिस्कीटांवर दुपारपर्यंत राहतात. वाढत्या वयात ही सवय डायबिटीससारख्या आजारांना आमंत्रण देते. सध्याची अनियमित जीवनशैली, झोपेचा अभाव, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे दिवसेंदिवस तरूणांमध्ये हा रोग वाढत जातोय.
नवीन अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार वेळेवर संतुलित आहार घेत असलेल्यांनामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अलिकडेच एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत या अभ्यासाचे विश्लेषण केले आहे.
खाण्याच्या वेळेचा शरीरावर परिणाम होतो
१०,५७५ लोकांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात डाइट डेटा, फास्टिंग ग्लूकोज आणि इंसुलिनवर सर्वे करण्यात आला. संशोधकांना असं दिसून आलं की, नाश्ता करण्याच्या वेळेचा रक्तातील सारखेच्या पातळीवर परिणाम होतो. दुपारी उशीरा नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत सकाळी साडे आठला नाश्ता करत असलेल्या लोकांच्या शरीरात साखरेची पातळी आणि इंसुलिन रेजिस्टंट कमी दिसून आला. प्री डायबिटीस आणि डायबिटीसच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर आणि हार्मोन इंसुलिन वाढणं धोक्याचे संकेत असतात.
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल
या अभ्यासात असं दिसून आलं की, ८:३० नंतर नाश्ता करत असलेल्यांमध्ये रक्ताची साखर आणि इंसुलिन रेजिस्टेंट दोन्हींमध्ये वाढ झाली होती. आजकाल वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या डाएट टेक्निक्स वापरल्या जात आहेत. अनेक अभ्यासातून असा दावा केला जातो की, ठराविक वेळेला थोडं थोडं खाल्ल्यानं मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होते.
दरम्यान या अभ्यासात असं दिसून आलं की, थोड्या थोड्या वेळ्यानं खाल्यानंतर इंसुलिन रेजिस्टंस वाढलं असून ब्लड ग्लूकोजमध्ये खास बदल झालेला नाही. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही किती खाता याबरोबरत कोणत्या वेळेला खाता हे सुद्धा महत्वाचं असतं.
डायबिटीस आणि एक्सरसाईजमधील संबंध
डायबिटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारच्यावेळी व्यायाम करणं फायदेशीर ठरतं. या अभ्यासानुसार टाईप२ डायबिटीसचे रुग्ण दुपारच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट करत असतील तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
जेवणात हे ५ पदार्थ जास्त खाल्ल्यानं वाढतो जीवघेण्या कॅन्सरचा धोका; डॉक्टरांनी सांगितलं कारण
Express.co.uk च्या रिपोर्टनुसार सकाळच्यावेळी हाय इंटेसिटी वर्कआऊट केल्यानं ग्लूकोजच्या पातळीत नकारात्मक परिणाम दिसून येतो. डॉक्टर जेफ फोस्टर यांनी Express.co.uk ला सांगितले की, ''व्यायामासाठी योग्य वेळ नाही. त्यापेक्षा तुम्ही त्यासाठी योग्य दिनचर्या बनवा.'' हार्वर्डच्या अहवालात असे म्हटले आहे की सामान्यतः व्यायाम करण्याची योग्य वेळ जेवणानंतर तीन किंवा चार तास असते. या काळात रक्तातील साखरेची पातळी बऱ्याचदा वाढते.