Join us   

How to control sugar level : डायबिटीसवर रामबाण ठरते 'ही' भाजी; हिवाळ्यात खाल्ल्यानं मिळतील भरपूर फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 11:59 AM

How to control sugar level : त्यातील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात.  यामुळेच शरीरात साखरेचं प्रमाण वाढण्याला प्रतिबंध करता येऊ शकतो.

हिवाळा हा खाण्यापिण्याच्या पदार्थांसाठी खूप चांगला ऋतू मानला जातो. (Winter Care Tips) हिवाळ्यात खूप ताज्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात. मेथीची भाजी डायबिटीसपासून (How to control sugar level ) हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळ्याच दृष्टीनं फायदेशीर ठरते.  इतकंच नाही तर वजन कमी करण्यासाठीही  मेथीची पानं गुणकारी ठरतात.  (Fenugreek leaves benefit) म्हणूनच आज तुम्हाला हिवाळ्यात मेथीची भाजी खाल्ल्यानं शरीराला कोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत.

डायबिटीससाठी फायदेशीर

मेथीची पानं टाईप १ आणि टाईप २ डायबिटीससाठी फायद्याची ठरतात. मेथी शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रणात ठेवते. जे डायबिटीक रुग्णांच्या चांगल्या तब्येतीसाठी महत्वाचं असतं. त्यातील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात.  यामुळेच शरीरात साखरेचं प्रमाण वाढण्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून डायबिटीक रुग्णांनी मेथीच्या भाजीचं सेवन करायला  हवं.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

मेथीच्या पानांच्या सेवनानं कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.  डायबिटीसबरोबरच एथेरेक्लेरोसिसच्या रुग्णांसाठी देखील  मेथी फायदेशीर ठरते.  अभ्यासानुसार शरीरातील गुड कॉलेस्ट्रॉल (HDL)  वाढण्यासाठी आणि बॅड कॉलेस्ट्रॉल कमी (LDL)  होण्यास मदत होते. 

पचनक्रिया सुधारते

 मेथीच्या पानांमध्ये फायबर्ससह एंटीऑक्सिडेंट्सही भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुरक्षित राहण्यास मदत होते. ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात मेथीचा समावेश करायला हवा.  मेथीच्या पानांमुळे गॅस, अपचनाची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त आतड्यांची सूज, पोटाचा अल्सरही कमी होतो. मेथीच्या पानांमुळे एसिडिटीची समस्याही दूर होते. 

 टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढवते

मेथी पुरूषांमध्ये सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन वाढण्यासाठी फायदेशीर ठरते. मेथीमध्ये  फुरोस्टेनॉलिक सैपोनिन (furostanolic saponins) असते ज्यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी मदत होते. 

शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज 'हे' ६ पदार्थ खा; अन् डायबिटीस वाढण्याचं टेंशन विसरा

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला मेथीपेक्षा  चांगला पर्याय शोधूनही सापडणार नाही.  मेथीच्या पानांमध्ये फक्त १३ कॅलरीज असतात.  मेथीची भाजी भाकरीबरोबर खाल्ल्यानंतर तुम्हाला बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटेल.  यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेणं टाळाल आणि लवकर भूकसुद्धा लागणार नाही. 

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्सअन्न