घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी अनेक जण डिओट्रंड किंवा परफ्यूमचा वापर करतात. तो एक हायजीन रूटीनचा भागच बनला आहे. बाजारात अनेक प्रकारचे डिओट्रंड मिळतात. काही लोकं डिओट्रंडचे एवढे शौकीन असतात की, ते विविध सुगंधीचे डिओ जमा करून ठेवतात. प्रत्येक ऋतूमध्ये डिओट्रंडचा वापर होतो. डिओट्रंड बॅक्टेरियाच्या वाढीमुळे होणारी दुर्गंधी काढून टाकते.
डिओड्रंट हे अल्कहोल व ट्रॅक्लोसन नामक रसायनात सुवासिक द्रव्य मिसळून बनवले जाते. ट्रॅक्लोसन हे एक जंतुनाशक रसायन आहे, जे डिओड्रंट व्यतिरिक्त टूथपेस्ट, साबण यात ही वापरले जाते. मात्र, डिओड्रंटचा अतिवापर शरीरासाठी हानिकारक मानले जाते.
डिओड्रंटमुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
डिओड्रंट वापरल्याने जॉर्जिया ग्रीन या १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये घडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चुकून एरोसोलचा वास घेतल्यानंतर, मुलीला हृदयविकाराचा झटका आला. तिने तिच्या खोलीत डिओड्रंट फवारले होते, त्यानंतर जॉर्जिया तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. खोलीत डिओड्रंट फवारल्याने तिला शांत वाटायचे. पालकांनी सांगितले की, ती ऑटिस्टिक होती.
डिओड्रंटमधील एरोसोल किती धोकादायक?
डिओड्रंटमधील एरोसोल विषारी रसायनेयुक्त असतात. ज्याचा वापर लहान मुलांनीच काय, प्रौढांनी देखील अधिक करू नये. डिओड्रंटच्या एरोसोलमध्ये टॉक्सिक, विषारी रसायने आणि वायू असतात. जे नैसर्गिक आणि कृत्रिम असे दोन प्रकारचे असतात. मुलांना डिओपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. डीओ ऐवजी टॅल्कम पावडर वापरणे चांगला पर्याय ठरू शकते.
परफ्यूम आणि डिओड्रंटमधील फरक
परफ्यूम आणि डिओड्रंट या दोन प्रोडक्ट्सच्या वापराबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये गोंधळ असतो. मात्र, दोन्ही प्रोडक्ट्स वेगवेगळे आहेत. परफ्युम आणि डिओ हे फ्रेशनेस आणि फ्रेग्रेंस या तत्वांशी निगडीत असतात. परफ्यूम हे एक सुगंधित लिक्विड आहे. तर, डिओमध्ये रासायनिक द्रव्य आढळतात. जी घाम येण्याची प्रक्रियाच कमी करते, म्हणजेच घाम उत्सर्जित करणारी त्वचेची द्वारेच बंद करतात. त्यामुळे घरी आल्यानंतर त्वचा स्वच्छ करून घेणे आवश्यक.
परफ्यूमचा सुंगंध बराच काळ टिकतो. मात्र, डिओड्रंटमध्ये अत्तराचे प्रमाण २ ते ३ टक्के इतके असते. ते फार काळ टिकत नाही. परंतु, डिओ त्वचेवरील पोर्स बंद करतात. त्यातील एंटीपर्सपिरेंट घाम येण्यापासून रोखतात. त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येत नाही.
डिओड्रंटच्या अतिवापरामुळे कोणत्या आजारांची भीती?
द कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटी (CERS) या नियतकालिकात प्रकाशित अहवालानुसार, ''काही डिओड्रंट त्वचा, डोळे आणि यकृताला हानी पोहोचवू शकतात. त्यातील काही रसायनांमुळे अल्झायमर्स आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. फुप्फुस आणि यकृताचे नुकसान होऊ शकते.''
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज विभागानुसार, ''डिओड्रंटमधील अॅल्युमिनियममुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी, डिओड्रंटचा नियमित वापर धोकादायक ठरू शकते.
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या अहवालानुसार, ''एरोसोल स्प्रेमधील रसायने श्वासाद्वारे दीर्घकाळ आत घेतल्याने, हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गुदमरल्यासारखे होते किंवा एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.''