Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; आणि..

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; आणि..

How Dehydration Affects Your Heart : कमी पाणी पिणे तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2024 07:56 PM2024-08-18T19:56:23+5:302024-08-18T19:57:26+5:30

How Dehydration Affects Your Heart : कमी पाणी पिणे तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकते..

How Dehydration Affects Your Heart | शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; आणि..

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; आणि..

शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे (Dehydration). ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो (Heart Disease). शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात (Health Tips).

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास शरीर नक्की कोणते संकेत देते? पाहूयात(How Dehydration Affects Your Heart).

हृदयाच्या आरोग्यावर धोका

पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. कारण डिहायड्रेशनचा शरीराच्या अवयवांवर आणि कार्यांवर नकारात्मक परिणाम होतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो.

शाहरुख खान रोज फक्त ४ -५ तासच झोपतो अशी चर्चा, आरोग्यासाठी कमी झोप त्रासदायक की..

अनियमित हृदयाचे ठोके

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो.

रक्त प्रवाह कमी होऊ लागतो

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते. ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अधिक दबाव टाकला जातो. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

शरीराचे तापमान असंतुलित होते

पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या तापमानात असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर देखील दबाव वाढतो.

किडनीवर विपरीत परिणाम

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवरही वाईट परिणाम होतो आणि किडनीच्या समस्यांमुळे हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो, कारण दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात.

मेहेंदीचा रंग फिकट - डिझाईनही जमत नाही? ४ ट्रेण्डी सोप्या डिझाईन्स; हात दिसतील सुंदर

चयापचय मंदावते

पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते. ज्यामुळे शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ वाढण्याचा धोका वाढू शकतो.

Web Title: How Dehydration Affects Your Heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.