Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

How Diabetes Affects Women: Symptoms, Risks And More : भूक, तहान लागण्याव्यतिरिक्त महिलांमध्ये दिसतात ५ विशेष लक्षणे, आरोग्याची काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 05:19 PM2023-10-18T17:19:06+5:302023-10-18T17:28:51+5:30

How Diabetes Affects Women: Symptoms, Risks And More : भूक, तहान लागण्याव्यतिरिक्त महिलांमध्ये दिसतात ५ विशेष लक्षणे, आरोग्याची काळजी घ्या..

How Diabetes Affects Women: Symptoms, Risks And More | मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

मधुमेह झाल्यावर महिलांमध्ये दिसतात ५ मुख्य लक्षणे, वेळीच ओळखा, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे. हा आजार होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. दुर्दैवाने मधुमेहावर कोणतेही इलाज नाही. पण होण्यापासून स्वतःचे रक्षण आपण नक्कीच करू शकतो. जेव्हा आपल्या शरीरातील चयापचय मंदावते, तेव्हा शरीर इन्शुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते, तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्याला वैद्यकीय भाषेत मधुमेह असे म्हणतात.

मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार निर्माण होतो. वेळीस काळजी न घेतल्यास ब्लड प्रेशरची पातळी वाढते. मधुमेह हा आजार एकच जरी असला तरी त्याचे लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळे दिसून येतात. जर महिलांना मधुमेह झाला असेल तर, त्यांच्यामध्ये ५ विशेष लक्षणे दिसून येतात(How Diabetes Affects Women: Symptoms, Risks And More).

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, मधुमेह जर होत असेल तर, महिलांमध्ये काही विशेष बदल दिसून येतात. मुख्य म्हणजे योनीतून बुरशीजन्य संसर्ग आणि वारंवार यूटीआयची समस्या उद्भवू शकते. ही समस्या मूत्रमार्गात प्रवेश करणाऱ्या जीवाणूंमुळे होते. त्यामुळे लघवी करताना वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा रंग लाल होणे अशी लक्षणे दिसू लागतात.

अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही अशी स्थिती आहे जेव्हा स्त्रीच्या शरीरात एंड्रोजन हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. मासिक पाळीची अनियमितता, वजन वाढणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, नैराश्य आणि वंध्यत्व यांसारखे समस्या वाढतात. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजार मधुमेह या आजाराच्या निगडीत आहे. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढते. अशा स्थितीत मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

जास्त तहान लागणे

जर आपण नेहमीपेक्षा जास्त पाणी पीत असाल तर, ही लक्षणे मधुमेह होण्याचा आहे. अशा स्थितीत घसा वारंवार कोरडा पडतो. ज्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. डायबिटिज होण्याचे तीन मुख्य लक्षणे आहते (सतत भूक, तहान आणि लघवी लागणे) त्यातील मुख्य लक्षण तहान लागणे आहे.

योनीमार्गात कोरडेपणा

जर आपल्याला योनीमार्गात जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर, अशा वेळी रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जाते. ब्लड शुगर वाढल्याने योनीच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचवते. यामुळे योनीचे नैसर्गिक चिकटपणा कमी होतो.

वजन कमी करायचं? मग खा सिमला मिरची! - वजन कमी करण्याचा एकदम सोपा आणि असरदार इलाज

झपाट्याने वजन वाढणे किंवा कमी होणे

रक्तातील साखर वाढल्याने महिलांचे वजन झपाट्याने वाढते किंवा कमी होते. जर आपल्याला टाईप - १ मधुमेहाची समस्या असेल, व आपण इन्शुलिन घेण्यास सुरुवात केली असेल, तर आपले वजन झपाट्याने वाढू शकते. एकंदरीत वजन वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या इन्शुलिन घेण्यावर अवलंबून आहे.

Web Title: How Diabetes Affects Women: Symptoms, Risks And More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.