Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

How Do Flat Feet Affect Your Overall Health? पायाचे तळवे आग करतात, पाऊलं दुखतात यावर नक्की उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 01:55 PM2023-04-14T13:55:15+5:302023-04-14T13:55:45+5:30

How Do Flat Feet Affect Your Overall Health? पायाचे तळवे आग करतात, पाऊलं दुखतात यावर नक्की उपाय काय?

How Do Flat Feet Affect Your Overall Health? | कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

शरीराचं संपूर्ण वजन तळव्यांवर पडते. पण जर तुमचा सोल योग्य नसेल तर, त्यामुळे पाठ आणि गुडघेदुखी होऊ शकते. या समस्येला फ्लॅट फूट असे म्हणतात. या समस्येमध्ये कोणतीही वेदना होत नाही. परंतु, बऱ्याच काळापर्यंत दुर्लक्ष केल्यास गुडघे, कंबर, पाय आणि तळवे सूजण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यामुळे तणाव देखील वाढते.

यासंदर्भात, योग तज्ज्ञ आकाश सिंघल सांगतात, ''चालण्याव्यतिरिक्त आपले तळवे जमिनीचा धक्का शोषण्याचे काम करतात. जेव्हा पायाची कमान कमी किंवा ताठ असते, तेव्हा त्याचा फटका थेट गुडघ्यापर्यंत आणि कंबरेवर पडतो. त्यामुळे कंबर व पाठदुखीसारखी समस्या निर्माण होते. तळाच्या या स्थितीला वैद्यकीयदृष्ट्य़ा पेस प्लानस म्हटले जाते. यामुळे चालण्याची क्षमता मर्यादित होते. म्हणून काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे(How Do Flat Feet Affect Your Overall Health?).

फ्लॅट फूट योग्य करण्याची पद्धत

​एक्यूप्रेशर पाथवर चाला

एक्यूप्रेशर मार्गावर चालणे हा उपाय सपाट पायांसाठी उपयुक्त ठरेल. दररोज किमान १० मिनिटे एक्यूप्रेशर मार्गावर चाला. किंवा गवतावर चालणेही फायदेशीर ठरू शकते.

भजी-वडे तळून उरलेलं तेल पुन्हा वापरणं योग्य की अयोग्य? तळलेल्या तेलाचं करायचं काय?

टॉवर एक्सरसाइज

एक टॉवेल पसरवा. आता त्याच्या एका बाजूला अर्धा सोल ठेवा. नंतर आपल्या बोटांनी टॉवेल वर आणण्याचा प्रयत्न करा. आपण टॉवेलऐवजी कापड देखील वापरू शकता. हा उपाय नियमित १० मिनिटांसाठी करा.

​वॉल एक्सरसाइज

हा व्यायाम करताना भिंतीचा आधार घ्या. पंजे भिंतीवर ठेवा आणि टाच जमिनीवर ठेवा. दोन्ही गोष्टी स्थिर ठेवून वासरांना हळूहळू ताण द्या. यामुळे वासराचे स्नायू ताणणे सुरू होईल. हा उपाय निदान १० मिनिटे करण्याचा प्रयत्न करा.

अंग मोडतंय? असह्य त्रास होतो? नसांचा कमकुवतपणा दुर्लक्ष करू नका, ५ व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

उत्तानासन

भिंतीचा आधार घेऊन उत्तानासन करणे फायदेशीर ठरू शकते. यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. दीर्घ श्वास घेताना दोन्ही हात वरच्या दिशेला हलवा, नंतर श्वास सोडताना हात खाली आणा. या दरम्यान, पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा, व त्याच स्थितीत परत या. यामुळे आपले पाय मजबूत आणि लवचिक बनतात. यासह पाठदुखी, कंबरदुखी या समस्येपासूनही आराम मिळेल. हे ४५ सेकंद किंवा शक्य तितक्या काळासाठी करा.

Web Title: How Do Flat Feet Affect Your Overall Health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.