भारतीय थाळीमध्ये चपाती, भाजी, डाळ, भात, यासह तोंडी लावण्यासाठी पापड, लोणची असे पदार्थ असतात. पण जर त्या थाळीमध्ये भात नसेल तर? काहींना भाताशिवाय जमत नाही. भात खाण्याचे फायदे यासह तोटे देखील आहेत. भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते, पचनसंस्था सुधारते. तर दररोज अधिक प्रमाणत भात खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. या सगळ्यात आपण भात कोणत्या पद्धतीने शिजवून घेत आहोत, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
काही लोकं भात कुकरमध्ये किंवा भांड्यात शिजवतात. पण आयुर्वेदिकतज्ज्ञ भात आयुर्वेदिक पद्धतीने शिजवण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदिक पद्धतीने भात कसा शिजवावा याची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामोनी यांनी दिली आहे(How do you cook rice according to Ayurveda?).
तांदळाबद्दल आयुर्वेद काय सांगते?
आयुर्वेदानुसार जेवणात तांदळाचे पहिले स्थान आहे. पांढरा तांदूळ पचायला खूप हलके असते. त्यामुळे भात नियमित खाण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात.
खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?
आयुवेदाच्या पद्धतीने अशा प्रकारे शिजवा भात
- आपल्या आहारात सोना मन्सूरी तांदूळ किंवा अंबर मोहर तांदळाचा समावेश करावा. तांदूळ शिजत घालण्यापूर्वी पाण्यातून २ ते ३ वेळा नीट धुवून घ्यावा.
- तांदूळ पाण्यात धुवून बाजूला ठेवा. यानंतर तांदुळाच्या प्रमाणानुसार अधिक दोन ते तीन कप पाणी भांड्यात ओता. व हे पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात स्वच्छ केलेले तांदूळ शिजवण्यासाठी ठेवा. व काही वेळानंतर भांडयावर झाकण ठेवा. यादरम्यान, झाकण उचलू नका किंवा भात शिजत असताना ढवळू नका. तांदूळ शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तांदळाचा एक दाणा काढून चेक करा.
रोज १० मिनिटं करा फक्त ४ सोपे व्यायाम, पोटाचा घेर-जाडजूड मांड्या कमी करण्यासाठी उपाय
- तांदूळ शिजत घालण्यापूर्वी किंवा शिजत असताना त्यात मीठ घालू नये, तांदूळ शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घालावे.
- भात शिजल्यानंतर जर त्यात पाणी शिल्लक राहिले असेल तर, गाळणीच्या मदतीने अतिरिक्त पाणी काढावे. व २ मिनिटांसाठी झाकण ठेवावे. अशा पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीचा भात खाण्यासाठी रेडी.