Blood clot symptoms in brain: सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं काही वेळानं बंद होतं. कारण जखम झालेल्या जागी ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ तयार होते. रक्ताची गाठ तयार होणं किंवा रक्त गोठणं ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी जखमेतून जाणाऱ्या रक्ताला रोखते. पण जेव्हा रक्ताच्या गाठी सामान्यापेक्षा जास्त तयार होतात तेव्हा अनेक समस्यांचा धोका वाढतो. कारण रक्ताच्या गाठी जेव्हा जास्त तयार होतात तेव्हा शरीराच्या आतही रक्ताच्या गाठी तयार होतात. जेव्हा मेंदुमध्ये रक्ताची गाठ तयार होतं किंवा शरीरात तयार झालेली एखादी रक्ताची गाठ मेंदुत जाते तेव्हा जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. अशात काही लक्षणांच्या माध्यमातून याबाबत जाणून घेता येतं. चला जाणून घेऊ अशात काही लक्षणांबाबत जे मेंदुत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे संकेत असू शकतात.
१) अचानक डोकेदुखी
डोकं दुखणं तशी तर फार सामान्य समस्या आहे आणि त्यामुळे याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण तुम्हाला माहीत नसेल की, अचानकपणे डोकं खूप जास्त दुखत असेल तर हा अनेक आजारांचा संकेत असू शकतो. त्यातील एक मेंदुत रक्ताची गाठ असणं हाही असू शकतो.
२) शरीराच्या एका भागात कमजोरी
शरीराच्या एका भागात कमजोरी होणं काही सामान्य लक्षण नाही. हे लक्षण शरीरात एखादा मोठा आजार असल्याचा संकेत असू शकतो. जसे की, लकवा, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन कॅन्सर, ब्रेन ड्यूमर किंवा मेंदुत ब्लड क्लॉट तयार होणं. हे सगळे आजार जीवघेणे आहे. त्यामुळे समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
३) शरीराचं संतुलन बिघडणं
जर तुम्हाला अचानक शरीरात संतुलन ठेवण्यास समस्या येत असेल तर, हाही एक संकेत असू शकतो की, तुमच्या मेंदुत रक्ताची गाठ तयार झाली असेल. मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्यावर अनेक केसेसमध्ये हे पहिलं लक्षण असू शकतं. ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
४) पुन्हा पुन्हा चक्कर येणं
जेव्हा मेंदुत रक्ताची गाठ तयार होते आणि आपण काही कारणाने त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा पुन्हा पुन्हा चक्कर येण्याची समस्या होते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.
५) कन्फ्यूज होणं
जेव्हा मेंदुमध्ये रक्ताची गाठ तयार होऊ लागते तेव्हा मेंदुची काम करण्याची प्रक्रिया प्रभावित होते. त्यामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमताही प्रभावित होते. व्यक्तीला अनेक गोष्टींमध्ये सतत कन्फ्यूजन होत राहतं.