Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थायराॅइडशी निगडित समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञ देतात ‘खास’ सल्ला, गरम पाण्याचा सोपा उपाय

थायराॅइडशी निगडित समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञ देतात ‘खास’ सल्ला, गरम पाण्याचा सोपा उपाय

थायराॅइडशी (thyroid) निगडित समस्या निर्माण झाल्यास अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हा धोका टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली (healthy life style) अवलंबण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. नियमित गरम पाणी प्यायल्यानं ( drinking hot water) अनेक आरोग्यविषयक समस्यांचा धोका टळतो..  तो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 06:14 PM2022-08-16T18:14:38+5:302022-08-16T18:23:06+5:30

थायराॅइडशी (thyroid) निगडित समस्या निर्माण झाल्यास अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हा धोका टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली (healthy life style) अवलंबण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. नियमित गरम पाणी प्यायल्यानं ( drinking hot water) अनेक आरोग्यविषयक समस्यांचा धोका टळतो..  तो कसा?

How drinking hot water helps reduce thyroid related problems? | थायराॅइडशी निगडित समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञ देतात ‘खास’ सल्ला, गरम पाण्याचा सोपा उपाय

थायराॅइडशी निगडित समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञ देतात ‘खास’ सल्ला, गरम पाण्याचा सोपा उपाय

Highlightsथायराॅइडशी निगडित समस्येमुळे पचन व्यवस्था बिघडते. गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात.वजन वाढण्याचा, पचनाशी निगडित समस्यांचा धोका नियमित गरम पाणी प्यायल्यास टळतो.

सध्याच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे थायराॅइडशी (thyroid)  निगडित समस्येने ग्रस्त रुग्णांची विशेषत: महिलांची संख्या वाढते आहे. शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथीशी निगडित समस्या निर्माण झाल्या की आरोग्यविषयक अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. वजन वाढणं, भूक न लागणं, त्वचा कोरडी होणं, केस गळणं या समस्या प्रामुख्यानं उद्भवतात. या समस्यांवर मात करुन थायराॅइडशी निगडित समस्या नियंत्रित राखण्यासाठी तज्ज्ञ प्रामुख्याने जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देतात. नोएडा येथील मॅक्स हाॅस्पिटल येथील फिजिशियन डाॅ. गुंजन मित्तल थायराॅइडशी निगडित समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला (drinking hot water to reduce thyroid problem)  देतात. डाॅ. गुंजन मित्तल यांच्या मते थायराॅइडशी निगडित समस्या उद्भवल्यास गरम पाणी पिणं फायदेशीर ठरतं. थायराॅइडच्या समस्येत वजन वाढण्याचा धोका (risk of weight gain) असतो. हा धोका टाळण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. गरम पाणी प्यायल्यानं थायराॅइडमुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्यांवरही नियंत्रण ठेवता येतं. 

Image: Google

गरम पाणी का प्यावं?

 1. थायराॅइडशी निगडित समस्या असल्यास पचन व्यवस्थेचं कार्य बिघडतं. अशा परिस्थितीत गरम पाणी पिण्याचा लाभ होतो. गरम पाणी रोज प्यायल्यास पचन क्रिया सुधारते. पोटात वेदना होणं, अपचन होणं, बध्दकोष्ठता होणं यासारख्या समस्या कमी होतात.

2.  थायराॅइडमध्ये शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत नसतो. गरम पाणी प्यायल्यानं रक्तप्रवाह सुधारतो. गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील नसा प्रसरण पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. 

Image: Google

3. गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक स्वच्छ होण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्यास घाम चांगला येतो. घामाच्याद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील हानिकारक घटकांचा धोका कमी होतो. 

4. थायराॅइडच्या समस्येत गरम पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील ऊर्जा वाढते. यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा धोका टळतो. गरम पाणी पिण्याची सवय आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो. पचनाशी निगडित समस्या दूर होतात. थायराॅइडशी निगडित समस्या नियंत्रित करण्यासाठी गरम पाणी पिणं हा सहज सोपा आणि प्रभावी उपाय असल्याचं डाॅ. गुंजन मित्तल सांगतात. 

Web Title: How drinking hot water helps reduce thyroid related problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.