Join us   

जवसाचे तेल आहारात रोज असले तर बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, हे किती खरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 1:51 PM

How Flaxseed oil helps to lower cholesterol levels नेहमीचे तेल बंद करुन जवसाचे तेल वापरुन भाज्या केल्या तर बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, हे खरे की खोटे?

भारतातील बहुतांश व्यक्ती बॅड कोलेस्टेरॉल या त्रासेला तोंड देत आहेत. कोलेस्टेरॉल दोन प्रकारच्या असतात. एचडीएल कोलेस्टेरॉलला गुड तर, एलडीएल कोलेस्टेरॉलला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात. बॅड कोलेस्टेरॉल वाढले की, नसांमध्ये जाऊन जमा होते. ज्यामुळे हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही.

अशा स्थितीत हृदयाच्या निगडीत अनेक समस्या वाढतात. बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात आपण वापरत असलेल्या तेलाचा देखील समावेश आहे. बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे पाहूयात(How Flaxseed oil helps to lower cholesterol levels).

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ निखिल वत्स सांगतात, ''फ्लॅक्ससीड्स म्हणजे जवस या बियांचे तेल अशा लोकांसाठी गुणकारी आहे, ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे. त्यांनी आपल्या आहारात या तेलाचा समवेश करावा. आपण हे तेल सॅलेडवरूनही खाऊ शकता. किंवा हलके गरम करून पदार्थात घालून खाऊ शकता.''

बॅड कोलेस्टेरॉल का वाढते?

जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते. जेव्हा जास्त चरबी जमा होते, तेव्हा ती रक्तातील इतर पदार्थांमध्ये मिसळून रक्तवाहिन्यांना चिकटून प्लेक्स तयार करतात. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल जमा होते, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात, ज्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यात अडचण निर्माण होते. ज्यामुळे हाय बीपीसारखा त्रास वाढतो.

भिजवलेले ४ बदाम रोज उपाशीपोटी खाण्याचे फायदे, बुद्धी होईल तेज आणि वजन कमी

जवस तेलाचे फायदे

फ्लॅक्ससीड्स तेल अंबाडीच्या बियाण्यांमधून काढले जाते. हे तेल फॅटी ऍसिडचे समृद्ध स्त्रोत आहे. त्यात ओलेइक अॅसिड, लिनोलेइक अॅसिड आणि अल्फा-लिनोलेनिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते. हे तेल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. म्हणूनच फ्लॅक्ससीड्स तेलाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं तर ५ प्रकारच्या बिया आहारात हव्याच, दिल-दिमाग दोन्ही तंदुरुस्त

जवस तेलाचे इतर फायदे

जवसाच्या तेलामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आढळतात. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ यासह मेंदूचे संरक्षण करण्यास मदत करतात. यासोबतच हे ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासही मदत करते. जर आपण वेट लॉस करत असाल तर, या तेलाचा आहारात समावेश करा. हे स्नायू तयार करते, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य