Join us   

रात्री झोप लागत नाही? रोज सकाळी लवकर ३० मिनिटे कोवळ्या उन्हात बसा, तज्ज्ञ सांगतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 1:57 PM

How Getting Sunlight in the Morning Can Improve Sleep कोवळ्या उन्हातून 'डी' जीवनसत्त्व मिळतं, ज्यामुळे हार्मोन संतुलित होण्यास मदत होते..

सकाळच्या कोवळ्या उन्हातून 'डी' जीवनसत्त्व मिळतं, असं सगळे म्हणतात. त्यामुळे कोवळं ऊन घेण्याचा सल्ला अनेक जण देत असतात. सकाळचा सूर्यप्रकाश आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले असते. आहारातून मिळणारं कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'डी' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्वचेवर ऊन लागलं, तर त्याचा फायदा जास्त मिळतो, स्किनचा पोत सुधारतो.

यासंदर्भात, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सकाळी ३० मिनिटे सूर्यप्रकाश का घेणे आवश्यक आहे? व त्याचे फायदे कोणते आहेत, हे त्यांनी सांगितले आहे(How Getting Sunlight in the Morning Can Improve Sleep).

सूर्यप्रकाशामुळे होतात हार्मोनल बदल

आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स आढळतात. शरीर सुरळीत चालण्यासाठी हार्मोन्स संतुलित राखणे गरजेचं आहे. हार्मोन्स असंतुलित होणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हार्मोनल बदलाव संतुलित ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश घेणं फायद्याचं ठरते. सकाळी ३० मिनिटे सूर्यप्रकाश नियमित घेतल्याने, शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन कमी होते व  मेलाटोनिन हार्मोन वाढते. ज्यामुळे रात्रीची झोप चांगली लागते व मूडही सुधारते.

तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

कोर्टिसोल हार्मोन म्हणजे काय?

कोर्टिसोल हार्मोनला स्ट्रेस हार्मोन देखील म्हणतात. शरीरात त्याचे संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. जे आपल्या शरीरात एड्रेनल ग्लँड या हार्मोनची निर्मिती करते. त्याच्या वाढीमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. हे हार्मोन मूडवर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण ठेवते. यासह रक्तदाब, चयापचय नियंत्रित ठेवते. त्याचे उत्पादन आपल्या शरीरात सकाळी अधिक होते. अशा परिस्थितीत सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने ते कमी होते.

मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

मेलाटोनिन हार्मोन म्हणजे काय?

मेलाटोनिन हार्मोनचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जर आपण रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात बसलो तर, आपल्या शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढते. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य