Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा

डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा

How long should dal be soaked in water before cooking : यात प्रोटीन्स, कार्ब्स, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. डाळ शिजवण्यापूर्वी व्यवस्थित भिजवली तर याचा पुरेपूर फायदा शरीराला मिळतो. यातील मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 03:59 PM2023-09-24T15:59:54+5:302023-09-24T18:30:29+5:30

How long should dal be soaked in water before cooking : यात प्रोटीन्स, कार्ब्स, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. डाळ शिजवण्यापूर्वी व्यवस्थित भिजवली तर याचा पुरेपूर फायदा शरीराला मिळतो. यातील मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात.

How long should dal be soaked in water before cooking : Why you must soak lentils before cooking them | डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा

डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा

आपल्या रोजच्या जेवणात सगळ्यात पौष्टीक पदार्थ म्हणजे डाळी. मूग डाळ, तूर डाळ अशा वेगवेगळ्या डाळींचा स्वंयपाकात वापर केला जातो.  वरणात, भाजीत तर कोणी सूपमध्ये डाळीचा समावेश करतं. रोज डाळी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. यात प्रोटीन्स, कार्ब्स, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. डाळ शिजवण्यापूर्वी व्यवस्थित भिजवली तर याचा पुरेपूर फायदा शरीराला मिळतो. यातील मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात. (How long should dal be soaked in water before cooking)

डाळ पाण्यात भिजवून शिजवल्याने काय होते?

भिजवलेल्या डाळीच्या तुलनेत भिजवलेली डाळ गुणकारी ठरते. यातून शरीराला बरीच पोषक तत्वे मिळतात. डाळ पाण्यात भिजवल्यामुळे  फुगते आणि त्यातील पोषण मुल्य वाढतात. प्रोटीन्सचे प्रमाणही वाढते. तुम्हाला डाळ खाल्ल्यानंतर प्रोटीन किती मिळणार हे डाळीच्या प्रकारावर आणि आकारावर अवलंबून असते. डाळ भिजवून व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर सालं काढून त्यातील पोरकिडे काढून टाका. नंतर डाळ आपल्या आवडीनुसार बनवा. तुम्ही प्रेशर कुकर किंवा कढईमध्येही डाळ बनवू शकता. 

डाळ शिजवण्याआधी पाण्यात किती वेळ भिजवावी

डाळ शिजवण्याआधी ८ ते १२ तास पाण्यात भिजवा. यामुळे प्रोटीन्स आणि फायबर्सचे प्रमाण वाढून त्यातील स्टार्च कमी होतील. याशिवाय डाळ भिजवल्याने लवकर शिजते आणि त्यातील पोषक घटक शरीराला मिळतात. सर्व डाळी जास्तवेळ भिजवण्याची गरज नसते.

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

मूग डाळ, मसूर डाळ  फक्त ६ ते ८ तास भिजवावी.  उडीद डाळ किंवा चण्याची डाळ १२ तास किंवा त्यापेक्षा अधिकवेळ भिजवावी लागते. डाळ भिजवण्याासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात थंड पाणी घ्या रात्रभर कमीत कमी ७ ते ८  तास डाळ भिजू द्या. सकाळी डाळीचे पाणी गाळून स्वंयपाकात तुम्ही  वापरू शकता. 

डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवण्याचे फायदे

डाळी भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. याचे पचनाच्या दृष्टीने अनेक फायदे  होतात. न्युट्रिएंट्स  शोषण्यास मदत होते. गॅस, पोट फुगण्याची समस्या कमी होते. जर तुम्हाला जेवणातून जास्त प्रोटीन्स आणि पोषण हवं असेल तर डाळी बनवण्याआधी भिजवायला विसरू नका.

Web Title: How long should dal be soaked in water before cooking : Why you must soak lentils before cooking them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.