Join us   

पाठीत- गुडघ्यांमध्ये वेदना, हाडं कमजोर झाली? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, दुखणं होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 12:36 PM

How Make Bone Healthy Facing Bone Related Diseases :

एका अभ्यासातून दिसून आले की सतत फास्टफूड खाल्ल्यानं हाडं झिजू शकतात. अशा पदार्थांमध्ये शुगर सॉल्ट लेव्हल जास्त असते. ज्यामुळे हाडांना नुकसान पोहोचते.  (Food For Strong Bones) यातील युरिनमध्ये कॅल्शियम वाढते आणि ही स्थिती किडनी प्रोब्लेम, किडनी स्टोनचा धोका होण्याचं कारण ठरते. यामुळे  मुत्रातील कॅल्शियमचं प्रमाण वाढते आणि ही स्थिती किडनी प्रोब्लेम्स, किडनी स्टोन होण्याचा धोका वाढवू शकते. ज्यामुळे हाडं कमजोर होतात. (How to Make Bone Healthy)

याव्यतिरिक्त जंकफूडमध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. ज्यामुळे एक्टिव्हीटीज मंद गतीने होतात. फिजिकली कमी एक्टिव्ह राहिल्यामुळे शरीराची रचना कमकुवत होते. वयाच्या तिशीनंतर ऑस्टिओपोरोसिस यांसारखे हाडांचे आजार होण्याचा धोका वाढतो.  हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की यामुळे बोन डेंसिटी कमी होते. योगगुरू बाबा रामदेव यांनी हाडं मजबूत करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. 

नॅशनल हेल्थ सर्विस युके च्या रिपोर्टनुसार हाडांना बळकटी मिळण्यासाठी व्हिटामीन डी युक्त् पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यामुळे ओस्टिओपॅरोसिसचा धोका टाळता येतो. सोयाबीन, टोफू, ब्राऊन ब्रेड, अंजीर,  जर्दाळू, कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांचे सेवन करायला हवे. फोर्टीफाईड फूड, सोया ड्रिंक्सचा आहारात समावेश करा.

जंकफूडची सवय धोकादायक

सतत जंकफूड खाल्ल्यानं हाडं कमकुवत होणं, किडनी पोब्लेम्स, किडनी स्टोन, ओबेसिटी, हायपरटेंशन, लठ्ठपणा या  समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये कंबरेत वेदना, डोक्याचं हाड मऊ होणं,  मनगट जास्त रूंद होणं, गुडघे  एकमेकांना लागणं, गुडघ्यांमध्ये सूज, बोट वाकडी तिकडी होणं या समस्या होतात. व्यवस्थित पोझिशनमध्ये न बसणं, चुकीची जीवनशैली, जास्त वजन वाढणं,  व्हिटामीन डी ची कमतरता, कॅल्शियमची कमी यामुळे हाडांचे विकार उद्भवतात.

रामदेव बाबा सांगतात हाडं मजबूत ठेवण्यासाठी आहारात कॅल्शियमचं प्रमाण वाढवा, १ कप दूधाचे सेवन करा, सफरचंदाचे व्हिनेगर घ्या, कोमट पाण्यात मध आणि दालचिनी घालून याचे सेवन करा. चहा-कॉफीचे सेवन टाळा, साखर कमीत कमी प्रमाणात खा, तळलेलं खाणं टाळा, वजन नियंत्रणात ठेवा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स