Join us   

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य ? सवय आणि स्ट्रेस म्हणून कॉफीचे मग रिचवत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 8:52 PM

How Many Cups of Coffee a Day Are Safe : Here’s the Exact Number of Cups of Coffee You Can Drink Per Day : कॉफी आवडते म्हणून सतत पीत असाल तर दिवसाकाठी किती कप तब्येतीला बरे...

कॉफी हे जगभरातील सगळ्यांचे आवडते पेय आहे. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. काहीजणांना तर कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही. सकाळी उठल्यानंतर एक कप गरमागरम कॉफी मिळाली तर दिवस चांगला जातो. इतकंच नाही तर ऑफिसच्या कामात व्यस्त असताना संध्याकाळीही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत कॉफी पिणं अनेकांना आवडत, यामुळे मूड फ्रेश होतो. कॉफी प्यायल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते(How Many Cups of Coffee a Day Are Safe).

जेव्हा कामाचा ताण वाढतो किंवा काम करून कंटाळा येतो तेव्हा पटकन रिफ्रेश होण्यासाठी कॉफीचा एक कप आपण घेतो. ऑफिसमध्येच नाही तर घरी  असल्यावर देखील संध्याकाळच्या वेळी थोडं फ्रेश होण्यासाठी कॉफी घेतली जाते. कॉफी प्यायल्याने  शरीरात थोडी ऊर्जा येते आणि लोकांना ताजेतवाने वाटते. कॉफी प्यायल्याने थकलेलं, मरगळलेले शरीर पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन पुढच्या कामाला लागते. कॉफी प्यायल्याने काही क्षणांतच फ्रेश वाटते  यामुळेच आपण सकाळी सर्वात आधी उठल्यावर कॉफी पितो.  त्यानंतर घरी किंवा ऑफिसमध्ये कॉफीची तलप लागल्यावर लगेच कॉफी पितो. परंतु अशी वारंवार कॉफी पिणे आपल्या शरीराला योग्य आहे की अयोग्य? क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी त्यांनी कॉफीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात(How many cups of coffee do people drink per day).

कॉफी पिण्याने होते नुकसान... 

 क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, कॉफीमध्ये कॅफीन नावाचा घटक असतो. कॅफीनचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास कॅफीन निश्चितच एकाग्रता वाढवते, पण जर ते जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं. जर तुम्हाला जास्त कॉफी पिण्याची सवय लागली असेल तर त्यामुळे तुम्हाला सतत डोकेदुखी होईल. जास्त कॉफी पिण्यामुळे नर्वस सिस्टम खूप जास्त सक्रिय होऊ लागेल ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. 

निती आयोगाच्या संचालक उर्वशी प्रसाद सांगतात, दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरशी मी लढले पण...

 जास्त कॉफी पिण्यामुळे वारंवार लघवी होऊन शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागेल. जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर कॉफी पित असाल तर त्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल. जर रात्री झोप आली नाही तर दिवसा तुम्हाला फ्रेश वाटणार नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्यावरील स्ट्रेस वाढेल.  जास्त कॉफीचा वाईट परिणाम पोटावरही दिसून येतो. जास्त कॉफी प्यायल्याने पोटांच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. ही सर्व कारणे लक्षात घेता कॉफी मर्यादित प्रमाणात पिणे गरजेचे असते. 

अंशुला कपूरने शेअर केला ‘स्व स्तन तपासणी’ व्हिडिओ, ८ स्टेप्स- ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी वेळीच करा...

दिवसभरात किती कप कॉफी प्यावी ? 

यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त  कॉफी पिऊ नये. वास्तविक, ४०० मिलीग्राम कॅफिन हे अंदाजे ४ कप कॉफीच्या समान असते. दिवसभरात चार कपपेक्षा कमी कॉफी प्यावी. काही औषधांसोबत कॉफी पिऊ नये. उदाहरणार्थ, श्वसनाच्या आजारांवर, छातीत जळजळ होत असेल आणि यावर जर तुम्ही औषधे घेत असाल तर आणि सर्दी - खोकल्यावर जर औषधे सुरु असतील तर त्यावर कॉफी पिऊ नये.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स