Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच? एका दिवसात किती कप चहा पिऊ शकता? जाणून घ्या

सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच? एका दिवसात किती कप चहा पिऊ शकता? जाणून घ्या

How many cups of tea can I drink each day Side Effects of Drinking Too Much Tea : एका दिवसात 3-4 कप चहा पिणे ठीक आहे, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त प्यायले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:17 PM2022-02-20T12:17:45+5:302022-02-20T12:35:11+5:30

How many cups of tea can I drink each day Side Effects of Drinking Too Much Tea : एका दिवसात 3-4 कप चहा पिणे ठीक आहे, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त प्यायले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

How many cups of tea can I drink each day : know how many cups of tea you should drink in a day | सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच? एका दिवसात किती कप चहा पिऊ शकता? जाणून घ्या

सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच? एका दिवसात किती कप चहा पिऊ शकता? जाणून घ्या

सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी पीत नाहीत असे खूपच कमी लोक आहेत. जर सकाळी चहा मिळाला नाही तर अनेकांचा दिवसच चांगला  जात नाही. अनेकांना नाश्ता करण्यात फारसा नसतो पण चहा बिस्किट्स किंवा नुसता चहा मिळाला तरी त्यांच्या दिवसाची सुरूवात छान होते. तुम्हीही चहाचे शौकीन असाल आणि दिवसभर भरपूर चहा पित असाल तर सावध राहा कारण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. अनेक लोकांसाठी चहा ही जीवनाची संजीवनी आहे. अशा लोकांना चहा मिळाला नाही तर त्यांची डोकेदुखी वाढते. चला तर मग जाणून घेऊया दिवसातून किती कप चहा प्यायला पाहिजे. (How many cups of tea can I drink each day )

एका दिवसात किती चहा प्यायला हवा?

रिपोर्ट्सनुसार, एका दिवसात 3-4 कप चहा पिणे ठीक आहे, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त प्यायले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण त्यामुळे पोटाचा त्रासही वाढतो. दुसरीकडे, जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासला असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही चहा प्यावा.

छातीत जळजळ आणि चक्कर येण्याची समस्या 

जास्त चहा प्यायल्याने छातीत जळजळ आणि अस्वस्थता देखील वाढते. याशिवाय जास्त चहा प्यायल्यानेही चक्कर येते. असे मानले जाते की जास्त चहा पिल्याने शरीर डी-हायड्रेट होते. शक्य असल्यास, दिवसभर मर्यादित प्रमाणात चहा प्या. जेव्हा तुम्हाला खूप जास्त चहा प्यावासा वाटत असेल तेव्हाच चहा प्यावा.

हाडं कमजोर होतात

जास्त चहा प्यायल्याने हाडे  कमकुवत होतात. टॅनिन्स, चहामध्ये आढळणारे एक संयुग, फॉलिक ऍसिडचे शोषण कमी करते, एक जीवनसत्व जे जन्म दोष कमी करते. त्यामुळे हाडांच्या कमकुवतपणाची तक्रारही हळूहळू वाढू लागते.

काळा चहा जास्त फायदेशीर

अभ्यासानुसार काळा चहा अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करतं. कारण काळ्या चहामधे कॅफिनचं प्रमाण कमी असतं. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहातो. तसेच काळ्या चहामधे फ्लोराइड असतं ज्यामुळे हाडाच्या आणि तोंडाच्या आजारांचा धोका कमी होतो.  काळ्या चहात आढळणार्‍या पॉलिफिनॉल्समुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच अभ्यास सांगतो की ज्या महिला नियमित काळा चहा घेतात त्यांना भविष्यात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

Web Title: How many cups of tea can I drink each day : know how many cups of tea you should drink in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.