Join us   

शरीरात रक्ताची कमतरता? हाडंही दुखतात? रोज १ खजूर खा; आरोग्याला छळणाऱ्या समस्या सुटतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 7:22 PM

How Many Dates Should You Eat a Day? : खजूर खाण्याच्या ५ जबरदस्त फायदे; तब्येतीच्या तक्रारी दूर

सकाळची सुरुवात नेहमी पौष्टीक आहाराने करायला हवं (Health Tips). नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ खाल्ल्याने आपल्याला लंचपर्यंत भूक लागत नाही. शिवाय आपण उलट सुलट पदार्थही खाणं टाळतो (Dates). काही जण सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा - कॉफी आणि मसालेदार पदार्थ खातात. पण यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. पण जर पौष्टीक ड्रायफ्रुट्स खाऊन दिवसाची सुरुवात कराल तर नक्कीच फायदा होईल.

आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांच्या मते, दिवसाची सुरुवात ड्रायफ्रुट्सने केल्याने आरोग्याला नक्कीच फायदा होईल. हेल्दी पदार्थाने दिवसाची सुरुवात न केल्यास, ब्लोटिंग, गॅसेस, हेअर फॉल आणि आयर्नची कमतरता भासू शकते. यासाठी आपण खजूर खाऊ शकता'(How Many Dates Should You Eat a Day?).

सकाळी खजूर खाण्याचे फायदे

आहारतज्ज्ञांच्या मते, 'शरीरात आयर्नची कमतरता भासल्यास आपण २ भिजलेले खजूर खाऊ शकता. खजूरमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता भासत नाही. यासह हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे ॲनेमियाचा धोका टळतो.

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

खजूर शरीराला उर्जा मिळते. १०० ग्रॅम खजूरमधून २७७ कॅलरीज मिळतात. शिवाय यातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं.

एक रुपयाही खर्च न करता स्ट्रेच मार्क्स होतील गायब; फक्त 'या' ४ तेलांचा करा असा सोपा वापर..

खजुरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट भरपूर वेळ भरलेलं राहतं. वजन जर आटोक्यात ठेवायचं असेल तर, आपण खजूर खाऊ शकता.

खजुरामध्ये कॅल्शियम आणि फाॅस्फरस असते. ज्याचा फायदा हाडांच्या आरोग्यासाठी पुरेपूर होतो. खजूर नियमित खाल्ल्याने हाडांच्या विकाराचा धोका टळतो.

खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहाण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे स्किन टवटवीत आणि सुंदर दिसते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य