Join us   

शुगर असेल तर दिवसातून कितीवेळा खाणं योग्य? कितीदा जेवल्यानं वजन आणि शुगर कमी होते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 7:16 PM

How Many Meals Should You Eat per Day? : तुम्ही दिवसातून किती वेळा जेवता?

अन्न हे आरोग्यासाठी वरदान (Meal).  साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो (Healthy food). सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात.

जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेमकं किती वेळा जेवावे? तज्ज्ञांच्या मते, अन्न पौष्टीक असण्यासोबतच ते योग्य वेळी घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक जण आहाराची योग्य काळजी घेत नाही. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर हेल्दी जीवन जगायचं असेल तर, जेवण करण्याची पद्धत आणि दिवसभरात किती वेळा जेवावे? हे पाहा(How Many Meals Should You Eat per Day?).

वेट लॉससाठी मदत

आरोग्य तज्ज्ञ प्रियंका सोनी यांनी सांगितले की, दिवसभरात वेळोवेळी जेवण घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने आपली चयापचय बुस्ट होते. याशिवाय कॅलरीज बर्न करण्यासही मदत मिळते.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

तीन वेळा अन्न खाणं टाळा

वजन कमी करायचे असेल तर दिवसातून तीन वेळा खाणे टाळा. त्याऐवजी, दिवसातून ५-६ वेळा छोटे मिल्स घ्या. यामुळे चयापचय बुस्ट होते. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

मधुमेहग्रस्त रुग्णांनी किती वेळा जेवावे?

मधुमेहग्रस्त रुग्णांनी दिवसभरात ५-६ वेळा कमी प्रमाणात कमी खावे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स