Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ओरल हेल्थसाठी दात दिवसांतून किती वेळा व कसे घासावेत? डेंटिस्ट सांगतात दात घासण्याची योग्य पद्धत...

ओरल हेल्थसाठी दात दिवसांतून किती वेळा व कसे घासावेत? डेंटिस्ट सांगतात दात घासण्याची योग्य पद्धत...

How Many Times Should You Brush Your Teeth a Day ? : आपले दात कसे स्वच्छ ठेवावे: तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, दात योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 12:54 PM2023-06-19T12:54:39+5:302023-06-19T15:45:18+5:30

How Many Times Should You Brush Your Teeth a Day ? : आपले दात कसे स्वच्छ ठेवावे: तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, दात योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

How Many Times a Day Should You Brush Your Teeth | ओरल हेल्थसाठी दात दिवसांतून किती वेळा व कसे घासावेत? डेंटिस्ट सांगतात दात घासण्याची योग्य पद्धत...

ओरल हेल्थसाठी दात दिवसांतून किती वेळा व कसे घासावेत? डेंटिस्ट सांगतात दात घासण्याची योग्य पद्धत...

लहानपणापासूनच आपल्याला दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व टूथपेस्टने दात घासण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी नियमितपणे  दात घासणे खूप महत्वाचे आहे. आपण आपले तोंड वेळोवेळी स्वच्छ ठेवून आपल्या ओरल हेल्थ केयरची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. दररोज ब्रश केल्याने दात किडणे, हिरड्यांचे रोग, तोंडातील वाईट बॅक्टेरिया आणि प्लाक काढून टाकण्यास मदत होते. स्वच्छ आणि चमकदार दात देखील आपले व्यक्तिमत्व सुंदर बनवतात. आपल्याला तोंडाशी निगडित कोणतेही आजार होऊ नये म्हणून, आपली ओरल हेल्थ खूप चांगली असणे गरजेचे असते.  

दातांची व ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी आपण सगळेच ब्रश करतो. सकाळी उठल्या उठल्या तर आपण ब्रश करतोच परंतु आपल्यापैकी काहीजणांना रात्री झोपायच्या आधी देखील ब्रश करण्याची सवय असते. दात व ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी दिवसातून किमान २ वेळा तरी ब्रश केले जाते. परंतु आता प्रश्न असा पडतो की दात निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून कोणत्या वेळी आणि किती वेळा ब्रश करावे. याशिवाय किती काळासाठी ब्रॅश करणे आवश्यक आहे. असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. यासाठीच दिल्लीतील सुप्रसिद्ध संजीवनी डेंटल केअर क्लिनिकचे डेंटिस्ट डॉ. अभिषेक गोयल यांनी नेमके दिवसातून किती वेळा ब्रश करावे तसेच कोणत्या वेळी करावे याबद्दलचा सल्ला दिला आहे(How Many Times a Day Should You Brush Your Teeth).

ब्रश करण्याबाबत डेंटिस्ट सांगतात की.... 

दात घासणे हे दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. यामुळे दातांमध्ये साचलेली घाण साफ होते. दात स्वच्छ राहिल्यास दात आणि हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. दात मजबूत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, सर्व लोकांनी दररोज सकाळी आणि रात्री असे दिवसातून किमान २ वेळा तरी ब्रश करणे आवश्यक आहे. ब्रश करताना ते योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. ब्रश हे उत्तम दर्जाचे असावे तसेच टूथपेस्टचा वापर करताना ती सामान्य टूथपेस्ट असावी. शक्यतो टूथपेस्ट वापरताना ती केमिकल फ्री असावी याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. त्याचबरोबर आपल्या दातांच्या आरोग्याला उपयुक्त ठरेल अशीच टूथपेस्ट वापरणे गरजेचे असते. 

उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

रात्री दात घासणे अधिक महत्वाचे... 

डॉ.अभिषेक गोयल यांच्या मते रोज सकाळी आणि रात्री घासणे आवश्यक आहे. सकाळी ब्रश करण्यासोबतच रात्री जेवल्यानंतर ब्रश करणे जास्त गरजेचे आहे, कारण रात्री झोपताना आपले तोंड अनेक तास बंद राहते आणि त्याचवेळी आपल्या तोंडात अनेक वाईट बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी रात्रीच्या जेवणानंतर किमान १ तासानंतर झोपण्यापूर्वी ब्रश करणे गरजेचे असते. ब्रश करून झोपल्यास, दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण निघून जाण्यास मदत होते, तसेच दात स्वच्छ होतात. यामुळे दातांमध्ये वाईट बॅक्टेरिया आणि कृमी वाढण्याचा धोका कमी होतो. ओरल हेल्थची काळजी घेताना टूथब्रश, टूथपेस्ट यासोबतच माऊथवॉशचा वापरही दिवसातून दोनदा करावा. दिवसभरात आपण जेव्हा कधी काही खात असू ते खाऊन झाल्यानंतर किमान पाण्याने तरीही २ ते ३ वेळा खळखळून चूळ भरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आपली ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर त्याचा आपल्या आरोग्यावर खुप चांगला परिणाम दिसून येतो. आपले मौखिक आरोग्य उत्तम ठेवूनच एकूण आरोग्य सुधारता येते.  

सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर... 

नेमके किती वेळ ब्रश करावे... 

डेंटिस्टच्या म्हणण्यानुसार, सर्वच वयोगटातील लोकांनी किमान ३ मिनिटे दात घासले पाहिजेत. हे घासणे जास्तीत जास्त ५ मिनिटे केले पाहिजे. ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळा दात घासल्याने दातांचे नुकसान होऊ शकते. दात घासताना ते हलक्या हातांनीच घासले पाहिजेत आणि सर्व दात पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजेत. दात स्वच्छ करण्यासोबतच जीभही स्वच्छ करावी. तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीभ साफ करणे देखील खूप महत्वाचे आहे. दातांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास गाफील न राहता तातडीने दंतवैद्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत.

पोटातून सतत गुडगुड आवाज येतो? ३ सोपे उपाय, पोटातली गडबड होईल बंद...

Web Title: How Many Times a Day Should You Brush Your Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.