Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ

हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ

How Massage May Help Lower High Blood Pressure : तळपायांना तेल मसाज हा तब्येत सुधारण्यासाठी एक जादूई उपाय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 03:30 PM2024-11-15T15:30:06+5:302024-11-15T17:31:13+5:30

How Massage May Help Lower High Blood Pressure : तळपायांना तेल मसाज हा तब्येत सुधारण्यासाठी एक जादूई उपाय आहे.

How Massage May Help Lower High Blood Pressure | हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ

हाय बीपीचा त्रास? रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना ‘या’ तेलानं करा मसाज-झोपही लागेल गाढ

आजकाल व्यस्त आणि बिघडलेल्या जीवनशैलीचा (Busy Lifestyle) फटका थेट आरोग्यावर होतो. वाढतं वजन, मधुमेह यासह हाय ब्लड प्रेशरचा त्रास अनेकांना होतो (Health Tips). या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी लोक औषधांसोबतच घरगुती उपायांचीही मदत घेतात.

जर आपल्याला हाय ब्लड प्रेशरचा (High Blood Pressure) त्रास असेल तर, आपण तळव्यांची मालिश करू शकता. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकते. या हा एक घरगुती उपाय आहे. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.पण तळव्यांची मसाज नक्की कोणत्या तेलाने करावे? रक्तदाबाव्यतिरिक्त आरोग्याला कोणते फायदे मिळतात?(How Massage May Help Lower High Blood Pressure).

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

जगन्नाथ योगशाळा या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, 'पायांची दुखणे वाढल्यावर तळव्यांना तेल लावून मसाज करा. यासाठी आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. मोहरीच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

स्नायूंना आराम आणि वेदनेपासून दूर

मोहरीचे तेल लावून तळव्यांना मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. यासह नसांवरही सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे पाय किंवा इतर दुखणे दूर होतात. जर आपल्याला पाय किंवा सांधे दुखण्याची समस्या असेल तर, तळव्यांना मोहरीचे तेल लावून मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.


झोपेचं चक्र सुधारते

तळवे मसाज करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झोप सुधारते. जर आपलं बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेचं चक्र बिघडलं असेल तर, रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि गाढ झोप येण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

मोहरीच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जे आपण तळव्यांना तेल लावून मसाज करता, तेव्हा ते शरीरात उष्ण निर्माण करतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

त्वचेसाठी फायदेशीर

मोहरीचे तेल त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. नियमित मसाज केल्याने तळव्यांची त्वचा मऊ आणि निरोगी राहते. हे तेल मृत त्वचा काढून टाकण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. 

Web Title: How Massage May Help Lower High Blood Pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.