Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराला प्रोटीन्सची गरज किती? खूप जास्त प्रोटीन घेणंही महागात पडू शकतं.. बघा अतिप्रोटीन खाण्याचे 4 धोके

शरीराला प्रोटीन्सची गरज किती? खूप जास्त प्रोटीन घेणंही महागात पडू शकतं.. बघा अतिप्रोटीन खाण्याचे 4 धोके

Side-effects of Eating Excess Proteins: आपला आहार प्रोटीनयुक्त असावा, हे अगदी खरं. पण प्रत्येकाला प्रोटीन्सची नेमकी गरज किती आणि प्रोटीन (lots of proteins) खाणं जर अति झालं तर काय होऊ शकतं, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 12:50 PM2022-06-09T12:50:05+5:302022-06-09T12:50:34+5:30

Side-effects of Eating Excess Proteins: आपला आहार प्रोटीनयुक्त असावा, हे अगदी खरं. पण प्रत्येकाला प्रोटीन्सची नेमकी गरज किती आणि प्रोटीन (lots of proteins) खाणं जर अति झालं तर काय होऊ शकतं, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे..

How much protein does the body need? Eating too much protein can be harmful to health. 4 side effects of eating too much protein | शरीराला प्रोटीन्सची गरज किती? खूप जास्त प्रोटीन घेणंही महागात पडू शकतं.. बघा अतिप्रोटीन खाण्याचे 4 धोके

शरीराला प्रोटीन्सची गरज किती? खूप जास्त प्रोटीन घेणंही महागात पडू शकतं.. बघा अतिप्रोटीन खाण्याचे 4 धोके

Highlightsतुमचं डाएट 'प्रोटीन रिच' असावं, 'एक्सेस प्रोटीन' असलेलं नसावं, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

प्रोटीन्सची कमतरता (protein deficiency) असणारे अनेक जण असतात, तसेच प्रोटीन्सचा इनटेक खूप जास्त असल्याने वेगवेगळे त्रास होणारेही अनेक असतात. कोणतीही गोष्ट अति झाली की तिचा त्रास होताेच. तसंच काहीसं प्रोटीन्सच्या बाबतीत आहे. प्रोटीन जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेत असाल तर त्याचे नक्कीच शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. प्रत्येकाचं वय, कामाचं स्वरूप, शारिरीक हालचाल यानुसार प्रत्येकाची प्रोटीन्सची गरज (need of protein) किती आहे, हे ठरत असतं. 

 

पण सध्या प्रोटीन रिच डाएट खाण्याचं फॅड इतकं जास्त वाढलं आहे, की त्या नादात अनेक जणं गरजेपेक्षा जास्त प्रोटीन्स घेत आहेत. आहारतज्ज्ञ डॉ. एलीन कँडे यांनी दिलेल्या माहितीनुसार निरोगी प्रौढ व्यक्तीला शरीराच्या वजनानुसार साधारणपणे ०.८ ते १ ग्रॅम प्रतिकिलोग्रॅम एवढे प्रोटीन आवश्यक असते. त्यापेक्षा जर अधिक प्रमाणात प्रोटीन्स खात असाल तर त्याचे पुढील दुष्परिणाम दिसू शकतात. 

 

गरजेपेक्षा जास्त प्रोटीन्स घेतल्याचे दुष्परिणाम
१. वजन वाढू शकते

प्रोटीन रिच डाएट वेटलॉससाठी उपयुक्त ठरते, असं आपण नेहमीच ऐकतो. पण असं करताना तुमचं डाएट 'प्रोटीन रिच' असावं, 'एक्सेस प्रोटीन' असलेलं नसावं, याची काळजी घेणं गरजेचं आहे. आहारात जर खूप जास्त प्रोटीन घेतले तर गरज असेल तेवढेच प्रोटीन वापरले जातात आणि उरलेले प्रोटीन एनर्जीच्या स्वरुपात शरीरात साठवून ठेवले जातात. यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढू शकते. 

 

२. किडनीवर परिणाम
ज्या रुग्णांना मुत्रपिंडाचे वेगवेगळे आजार आहेत, त्यांना प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्याने त्रास होऊ शकतो. शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करते. या कामात अतिप्रोटीन्समुळे किडनीवर दबाव निर्माण होऊन अडथळा येऊ शकतो. यातून किडनी स्टोन होण्याचा त्रासही उद्भवू शकतो.

 

३. हाडांच्या समस्या
२०१३ साली लॉनिस डेलीमॅरिस यांच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार असं निदर्शनास आलं होतं की प्रोटीनचे अतिसेवन आपल्या हाडांसाठी अजिबातच योग्य नाही. कारण शरीरात खूप प्रोटीन झालं तर त्यापासून एक ॲसिडदेखील खूप जास्त प्रमाणात तयार होतं. हे ॲसिड हाडांमधील कॅल्शियमचं प्रमाण घटवतं. या अभ्यासात असंही म्हणण्यात आलं होतं की असा त्रास होऊ नये म्हणून प्रोटीन्स मांसाहारातून घेण्यापेक्षा पालेभाज्यांमधून जास्तीत जास्त प्रमाणात घेणं आरोग्यासाठी कधीही चांगलं. 

 

४. डिहायड्रेशन
काही वर्षांपुर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार प्रोटीन्सचे अतिरिक्त सेवन शरीराला डिहायड्रेट करते. म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी करते. यात जर पाणी कमी पिण्याची सवय असेल तर डिहायड्रेशनचा अधिकच त्रास होऊ शकतो. त्यामुळेही अशक्तपणा, मळमळ, कायम डोकेदुखी होणे, असे त्रास उद्भवू शकतात. 

 

Web Title: How much protein does the body need? Eating too much protein can be harmful to health. 4 side effects of eating too much protein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.