Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एका दिवशी जास्तीतजास्त किती साखर खावी? आहारतज्ज्ञ सांगतात- साखर सोडणं कठीण वाटत असेल तर...

एका दिवशी जास्तीतजास्त किती साखर खावी? आहारतज्ज्ञ सांगतात- साखर सोडणं कठीण वाटत असेल तर...

How To Stop Sugar Craving: साखर खाणं एकदमच बंद करणं कठीण वाटत असेल तर सुरुवातीला काही दिवस हा प्रयोग करून पाहा.....(How much sugar you can eat per day)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 09:08 AM2024-03-13T09:08:54+5:302024-03-13T09:10:01+5:30

How To Stop Sugar Craving: साखर खाणं एकदमच बंद करणं कठीण वाटत असेल तर सुरुवातीला काही दिवस हा प्रयोग करून पाहा.....(How much sugar you can eat per day)

How much sugar you can eat per day, how to stop sugar craving | एका दिवशी जास्तीतजास्त किती साखर खावी? आहारतज्ज्ञ सांगतात- साखर सोडणं कठीण वाटत असेल तर...

एका दिवशी जास्तीतजास्त किती साखर खावी? आहारतज्ज्ञ सांगतात- साखर सोडणं कठीण वाटत असेल तर...

Highlightsगोड पदार्थांऐवजी गोड फळं, खजूर, डार्क चॉकलेट असं खा. जेणेकरून गोड खाण्याचं क्रेविंग होणार नाही. 

आरोग्यासाठी साखर खाणं अतिशय वाईट, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. आपल्याला ते पटत असलं तरी एकदम साखर खाणं बंद करणं खूप जड जातं. त्यामुळे मग काही दिवसांतच अशी वेळ येते की आपला स्वत:वरचा सगळा ताबा सुटतो आणि पुन्हा साखर खाणं सुरू होतं. असं होऊ नये म्हणून साखरेच्या सेवनाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर पुर्णपणे बंद करण्यासाठी काय करावं (how to stop sugar craving), दिवसाला जास्तीतजास्त किती साखर खाणं आरोग्यासाठी चालू शकतं, याविषयी बघा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला.(How much sugar you can eat per day)

 

सध्या काही मोजके अपवाद सोडले तर प्रत्येकाचंच साखरेचं सेवन वाढलेलं आहे. साखर अतिरिक्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढीची, मधुमेहाची समस्या खूपच जास्त वाढली आहे.

साध्याच साडीला मॉडर्न लूक देण्यासाठी ३ खास टिप्स, स्वस्तातल्या साडीमध्येही दिसाल स्मार्ट- स्टायलिश

तसेच साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढला आहे. आहारतज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की साखरेचा अतिरेक झाल्यामुळे एजिंग प्रोसेस लवकर सुरू होते. शिवाय त्यामुळे ॲक्ने आणि त्वचेशी संबंधित इतर तक्रारीही वाढत जात आहेत. तसेच खूप जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास एनर्जी लेव्हलही कमी होत जाते. त्यामुळे साखर खाणं टाळायलाच हवं. पण ती एकदम बंद करणं जमत नसेल तर पुढील काही गोष्टी करून पाहा.

 

साखर खायचीच असेल तर...

दिवसाला किती प्रमाणात साखर खाल्ली तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही, याविषयी ndtv.com यांनी दिलेल्या वृत्तात आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी असे सांगितले आहे की प्रौढ महिलांनी एका दिवशी २५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. तर प्रौढ पुरुषांनी ३८ ग्रॅम एवढंच साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवावं. एवढ्या मर्यादित प्रमाणात साखर खात असाल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही.

कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं टेन्शन विसरा

पण एवढ्या प्रमाणात जर तुम्ही स्वयंपाक घरातली पांढरी साखर खात असाल तर इतर काेणतेही गोड पदार्थ, प्रोसेस्ड फूड, रेडिमेड फ्रुट ज्यूस असं सगळंच खाणं टाळलं पाहिजे ज्यात सुक्रोज, फ्रुक्टोज, कॉर्न सिरप किंवा इतर कोणतेही स्वीटनर असतील.

गोड पदार्थांऐवजी गोड फळं, खजूर, डार्क चॉकलेट असं खा. जेणेकरून गोड खाण्याचं क्रेविंग होणार नाही. 
 

Web Title: How much sugar you can eat per day, how to stop sugar craving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.