मानवी शरीर हे ७० टक्के पाण्याने भरलेले असते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याची महत्वाची भूमिकी असते. पाणी जेवणातील पोषक तत्व शोषून घेण्यात मदत करते. याशिवाय गॅस, एसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात. (Best Time To Drink Water) योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होता आणि त्वचेच्या सौंदर्यात भर पडते. पाणी किडनीतील घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. किडनी स्टोनसारख्या समस्याही उद्भवत नाहीत. (How Much Water Drink A Day And Best Time To Drink Water As Per Ayurveda)
मेंदूचा ७३ टक्के भाग हा पाण्याने तयार झालेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते याशिवाय डोकेदुखीची समस्याही उद्भवते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते एकाग्रता वाढण्यास मदत होते. शरीराच्या चांगल्या कामकाजासाठी पाण्याची किती आवश्यकता असते हे माहीत असायला हवं.
व्यक्तीने रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवं (How Much Water Should And Adult Drink Per Day)
व्यक्तीने रोज किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. जसं की वजन, वय, लिंग यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शरीराला तरल पदार्थांची कितपत आवश्यकता आहे ते ठरवून तुम्ही दैनिक पाण्याच्या गरजेचं प्रमाण ठरवू शकता.
मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार एका निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनाच्या जवळपास ३५ मिलीलिटर पाण्याची आवश्यकता असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जितकं वजन असेल तितकी पाण्याची आवश्यकता असते.
५० किलो वजनाच्या व्यक्तीने जवळपास १.७ लिटर पाणी प्यायला हवं, ६० किलो वजन असलेल्या व्यक्तीने २.१ लिटर पाणी प्यायला हवं. ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीने रोज २.४ लिटर पाणी प्यायला हवं. ७० किलोग्राम वजनाच्या व्यक्तीने रोज जवळपास २.४ लिटर पाणी प्यायला हवं. ८० किलोग्राम वजनाच्या व्यक्तीने रोज २.८ लिटर पाणी प्यायला हवं.
जितकं जास्त शारीरिक काम तितकी पाण्याची गरज जास्त
काही लोकांना शरीराची झीज भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे. जेव्हा कधीही तुम्हाला तहान लागेल तेव्हा भरपूर पाणी प्या.
आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे नियम ( Rules For Drinking Water as Per Ayurveda)
पाणी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात प्यायल्यास त्याचे पुरेपूर फायदे मिळतात. घाम येणं, एसिडीटी होणं, तोंड कोरडं पडणं, पिवळ्या रंगाची लघवी होणं अशा समस्या उद्भवतात. जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या. वाताने पीडित असलेल्यांनी जेवणाच्या ३० मिनिटांनंतर आणि कफ असेल तर जेवणाच्या ३० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. पाणी घोटून प्या. रूम टेम्परेचरवर असलेल्या पाण्याचे सेवन करा. पाणी ठेवण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर करा.